क्लासीला वाटतेय तिच्या कादंबरीवर बनावा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 19:13 IST2016-12-20T19:13:29+5:302016-12-20T19:13:29+5:30

मॉडेल ऐबे क्लासी सध्या भलतीच खूश आहे. मात्र तिला खºया अर्थाने आनंद तेव्हा होईल जेव्हा तिच्या ‘रिमेंबर माय नेम’ ...

The classy feels that the movie will be made on her novel | क्लासीला वाटतेय तिच्या कादंबरीवर बनावा चित्रपट

क्लासीला वाटतेय तिच्या कादंबरीवर बनावा चित्रपट

डेल ऐबे क्लासी सध्या भलतीच खूश आहे. मात्र तिला खºया अर्थाने आनंद तेव्हा होईल जेव्हा तिच्या ‘रिमेंबर माय नेम’ या कादंबरीवर चित्रपट निर्माण होईल अन् त्यात ती अभिनय करेल. 

फिमेलफर्स्ट डॉट को डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार क्लासीने सांगितले की, माझी मनापासून इच्छा आहे की, माझ्या कादंबरीवर एखादा चित्रपट तयार केला जावा अन् त्यात मला काम करण्याची संधी मिळावी. मी स्टीवन स्पीलबर्ग यांना फोन करून चित्रपटासाठी आग्रह करणार आहे. मी या चित्रपटात स्वार्थी एजंटची भूमिका साकारणार आहे, तर जेनिफर लॉरेंस यात मुख्य भूमिकेत असावी, अशी माझी इच्छा आहे. कारण ती माझी फेव्हरेट अ‍ॅक्ट्रेस आहे. 

क्लासीला आश्चर्य वाटतेय की ती कादंबरी लिहू शकली. त्यामुळे जेव्हा ती तिची कादंबरी बुकस्टॉलमध्ये विक्रीसाठी बघतेय तेव्हा ती दंग राहते. याविषयी क्लासीने सांगितले की, मी बºयाचदा माझी कादंबरी बुकस्टॉलमध्ये विक्रीसाठी बघितली तेव्हा मला माझा खूपच अभिमान वाटत होता. तसेच हे खूप चांगले घडत असल्याची भावनाही निर्माण होत होती.

Web Title: The classy feels that the movie will be made on her novel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.