...ही आहे क्रिसची नवी गर्लफ्रेंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 20:42 IST2016-12-28T20:40:17+5:302016-12-28T20:42:38+5:30

गायक क्रिस ब्राउन सध्या खूश आहे, त्याची नवी गर्लफ्रेंड क्रिस्टा सॅँटियागो हिच्याविषयी तो गंभीर असून, तिच्याकडे त्याने घराच्या चाव्या ...

... this is Chris's new girlfriend! | ...ही आहे क्रिसची नवी गर्लफ्रेंड!

...ही आहे क्रिसची नवी गर्लफ्रेंड!

यक क्रिस ब्राउन सध्या खूश आहे, त्याची नवी गर्लफ्रेंड क्रिस्टा सॅँटियागो हिच्याविषयी तो गंभीर असून, तिच्याकडे त्याने घराच्या चाव्या सुपूर्द केल्या आहेत. हॉलिवूडलाइफ डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार क्रिस ब्राउन क्रिस्टा सॅटियागो हिला दाखवून देऊ इच्छितो की, तो तिच्यावर किती प्रेम करतो. सूत्रानुसार क्रिस आणि क्रिस्टा सध्या एकमेकांना डेट करीत आहेत; मात्र क्रिसला रिहाना आणि करूएच ट्रान यांच्यासोबतच्या नात्यामुळे माध्यमांनी लक्ष्य केले असल्याने तो यावेळेस माध्यमांपासून दूर राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. 



क्रिसप्रमाणेच क्रिस्टादेखील त्यांच्यातील नात्यावर चुप्पी साधून आहे. त्यामुळे हे दोघेही एकमेकांप्रती फारसे गंभीर नसल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगत आहे;. मात्र माध्यमांचा हा दावा खोडून काढण्यासाठी क्रिस पुरेपूर प्रयत्न करीत असून, तो क्रिस्टाला तिच्याप्रती असलेले प्रेम दाखवून देण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. क्रिस्टावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी क्रिस तिला नेहमीच गिफ्ट देत असतो. दोघांनाही पेटिंग आणि संगीताची आवड असल्याने आपली आवड पूर्ण करण्यासाठी दोघे वेळ व्यतीत करताना बºयाचदा बघावयास मिळाले. 



नुकतेच क्रिसने तिला एक अनमोल गिफ्ट दिले आहे. तिच्या हातात आपल्या घराच्या चाव्या देऊन आता तूच माझी जीवनसाथी असे तो म्हणाला आहे. क्रिसचे प्रेम बघून क्रिस्टा भारावली असून, दोघेही एकमेकांप्रतीचे प्रेम जाहीर करण्याची शक्यता आहे!

Web Title: ... this is Chris's new girlfriend!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.