मुलीच्या जन्माच्या व्हिडीओसाठी चीयनाने घेतले दहा लाख डॉलर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 20:34 IST2016-11-22T20:29:00+5:302016-11-22T20:34:45+5:30

अमेरिकेत रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टारचा सध्या चांगलाच बोलबाला आहे. कारण ही स्टारमंडळी कुठल्या मार्गाने पैसा कमावणार हे सांगणे मुश्किलच. मुळात ...

Cheena took $ 10 million for the girl-child video | मुलीच्या जन्माच्या व्हिडीओसाठी चीयनाने घेतले दहा लाख डॉलर्स

मुलीच्या जन्माच्या व्हिडीओसाठी चीयनाने घेतले दहा लाख डॉलर्स

ेरिकेत रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टारचा सध्या चांगलाच बोलबाला आहे. कारण ही स्टारमंडळी कुठल्या मार्गाने पैसा कमावणार हे सांगणे मुश्किलच. मुळात नेहमीच कॉन्ट्राव्हर्सी घेºयात असलेले हे स्टार इव्हेंट कंपन्यांसाठीही पैशाचा स्त्रोत बनले आहेत. आता हेच बघा ना, रॉब कर्दाशियां आणि मॉडेल ब्लाक चीयना या दाम्पत्याने चक्क मुलगी ड्रीम हिच्या जन्माचे क्षण शूट करण्यासाठी चक्क दहा लाख डॉलर वसूल केले. 

एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका आठवड्यापूर्वी जन्मलेल्या ‘ड्रीम’च्या जन्माचे काही क्षण कॅमेºयात कैद करण्यात आले. मुलीचे स्वागत करताना या दाम्पत्याने नवजात मुलीवर छोटी फिल्म बनविण्यासाठी ‘ई’ चॅनलच्या कॅमेरामॅन यांना डिलिव्हरी रुममध्ये प्रवेश देण्यास परवानगी दिली. 

रडार आॅनलाइनला दिलेल्या माहितीनुसार, चीयना आणि रॉबला याकरीता १० लाख डॉलर देण्यात आले. मुलीच्या जन्माचा हा व्हिडीओ लोकांपर्यंत पोहोचावा याकरीता ‘रॉब अ‍ॅण्ड चायना’ या शोच्या एका अतिरिक्त एपिसोडमध्ये हा व्हिडीओ दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे या दाम्पत्याला १० लाख डॉलरबरोबरच अन्य काही बाबींकरीता देखील निर्मात्यांकडून मानधन दिले जाणार आहे. 

एक तासाचा असलेला ‘रॉब अ‍ॅण्ड चीयना बेबी स्पेशल’ हा शो १८ डिसेंबर रोजी प्रसारित केला जाणार आहे. यापूर्वी देखील बºयाचशा टीव्ही स्टार्सनी डिलिव्हरी रुममधील व्हिडीओसाठी लाखो डॉलर्स मानधन घेतले आहे. आता त्यामध्ये रॉब अ‍ॅण्ड चीयना या दाम्पत्याचाही समावेश झाला आहे. या दाम्पत्याच्या मुलीच्या जन्माचे क्षण चाहत्यांच्या पसंतीस उतरतील अशी अपेक्षा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. 

या व्हिडीओची वार्ता सोशल मीडियावर पसरली असून, चाहत्यांकडून त्यावर विचित्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. 

Web Title: Cheena took $ 10 million for the girl-child video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.