​चार्लीज् थेरॉनला वाटत नाही वयाची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 18:05 IST2016-11-10T18:03:44+5:302016-11-10T18:05:29+5:30

आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये वयाच्या चाळीशीनंतर अभिनेत्रींच्या करिअरला उतरती कळा लागते. तसे हॉलीवूडमध्येसुद्धा होते का? प्रसिद्ध अभिनेत्री आणि ४१ वर्षीय स्टार ...

Charliez Theron does not believe the fear of age | ​चार्लीज् थेरॉनला वाटत नाही वयाची भीती

​चार्लीज् थेरॉनला वाटत नाही वयाची भीती

ल्या चित्रपटसृष्टीमध्ये वयाच्या चाळीशीनंतर अभिनेत्रींच्या करिअरला उतरती कळा लागते. तसे हॉलीवूडमध्येसुद्धा होते का? प्रसिद्ध अभिनेत्री आणि ४१ वर्षीय स्टार चार्लीज थेरॉनला तरी निदान असे नाही वाटत. ‘मॅड मॅक्स : फ्युरी रोड’ स्टारला वाटते की, हॉलीवूडमध्ये काम मिळवण्यासाठी वय आणि सौंदर्य या दोन कसोट्या आता मागे पडल्या आहेत.

एक काळ असा होता की, कित्येक हीरोईन्स आपले वय लपवून ठेवण्यासाठी खूप मेहनत घेत असत. वय झाल्यावर आपल्याला काम मिळणार नाही, अशी त्यांना भीती वाटत असे. परंतु आज परिस्थिती तशी राहिलेली नाही. तिच्या मते, वयाच्या चाळीशीमध्ये ती वीस वर्षांची असतानापेक्षा जास्त काम करतेय.

ती म्हणते, ‘वयाची समस्या हॉलीवूडमध्ये होती. पण आजच्या काळात लोकांची मानसिकता बदललेली आहे. ते कलेचा कला म्हणून स्विकार करतात. त्यामुळे पूर्वीपेक्षा आता माझ्याकडे या वयात अधिक रोल आॅफर्स येतात. आपण कसे दिसतो याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. वय वाढणे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती तर होणारच. ’


मॅड  फ्युरोसा : चार्लीज थेरॉन

यंदाच्या आॅस्कर पुरस्कारांवर बाजी मारणाऱ्या ‘मॅड मॅक्स : फ्युरी रोड’मधील तिच्या ‘फ्युरोसा’चे खूप कौतुक झाले. ती सांगते, ‘वयानुसार तुम्हाला कदाचित लहान वयाच्या भूमिका मिळणार नाही. परंतु आता पटकथा एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लिहिल्या जात आहेत की, सर्वच वयाच्या कलाकारांना करण्यासाठी खूप काम आणि संधी आहे.’

बरं असे विचार केवळ तिचेच नाही. तिच्या समवयस्क इतर अभिनेत्रींचेसुद्धा हेच मत आहे की, वय म्हणजे केवळ आकडा असतो. त्याचा जास्त विचार करायचा नाही . बॉलीवूडमध्ये मात्र परिस्थिती आहे तशीच आहे. करिअर संपून जाईल या भीतीने कलाकार लग्नसुद्धा करीत नाहीत किंवा बाहेर कळू देत नाही. हॉलीवूडकडून हीदेखील प्रेरणा घ्यायला पाहिजे. हो ना?

Web Title: Charliez Theron does not believe the fear of age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.