‘कसीनो रॉयल’ फेम दालिआ लवीचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2017 16:35 IST2017-05-07T11:05:59+5:302017-05-07T16:35:59+5:30

‘कसीनो रॉयल’ फेम अभिनेत्री दालिआ लवी हिचे वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाले आहे. दालिआ लवी हिच्या परिवाराकडून तिच्या मृत्यूच्या ...

'Casino Royale' fame dalia lavi passes away | ‘कसीनो रॉयल’ फेम दालिआ लवीचे निधन

‘कसीनो रॉयल’ फेम दालिआ लवीचे निधन

सीनो रॉयल’ फेम अभिनेत्री दालिआ लवी हिचे वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाले आहे. दालिआ लवी हिच्या परिवाराकडून तिच्या मृत्यूच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. असे म्हटले जात आहे की, दालिआने नार्थ कॅरोलिनाच्या एशविले स्थित घरात ३ मे रोजी अखेरचा श्वास घेतला. तिच्यावर अंतिम संस्कार इस्त्राइल येथे केले जाणार आहे. हॉलिवूडपटांमध्ये गुप्तहेराची भूमिका साकारण्यासाठी दालिआ लवी हिला ओळखले जात होते. शिवाय ती सेक्स सिम्बल म्हणूनही प्रसिद्ध होती. 

हॉलिवूडपटांमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेल्या दालिआने चार्ल्स गॅन्स याच्याशी विवाह केला होता. तिला रॉबेन, अलेक्जेंडर, स्टीफन नावाचे तीन मुले अन् कॅथी रोथमॅन नावाची मुलगी आहे. १२ आॅक्टोबर १९४२ रोजी फिलीस्तीन येथे जन्मलेल्या दालिआने स्वीडनच्या स्टाकहोम येथे शिक्षण घेतले. १९५५ मध्ये आलेल्या ‘द पीपुल आॅफ हेम्सो’ या हॉलिवूडपटातून तिने डेब्यू केला होता. 



‘सायलेंसर’ या चित्रपटातील एका सीनप्रसंगी डीन मार्टिनसोबत दालिआ लवी  
मात्र तिला खरी ओळख १९७६ मध्ये आलेल्या ‘कसीनो रॉयल’ या चित्रपटाने मिळवून दिली. चित्रपटात ती गुप्तहेराच्या भूमिकेत होती. तिने साकारलेली ही भूमिका त्यावेळी हॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय बनला होता. दालिआने ‘द गेम आॅफ ट्रुथ (१९६१), ओल्ड शेटरहॅण्ड (१९६४), टेन लिटिल इंडियंस (१९६५). द सायलेंसर (१९६६), नोबडी रन्स फॉरएव्हर (१९६८) आणि कॅटलो (१९७१)’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 

Web Title: 'Casino Royale' fame dalia lavi passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.