​ब्रुकलिनचा न्यू हेअरकट डिट्टो डेव्हिडसारखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2016 13:49 IST2016-10-23T13:47:56+5:302016-10-23T13:49:10+5:30

डेव्हिड व व्हिक्टोरिया बेकहॅमचा मोठा मुलगा बु्रकलिन सध्या त्याच्या नव्या हेअरस्टाईलमुळे चर्चेत आहे. सोनेरी रंगाची छटा असणारे त्याचे थोडेसे ...

Brooklyn's New Haircut Like Dito David | ​ब्रुकलिनचा न्यू हेअरकट डिट्टो डेव्हिडसारखा

​ब्रुकलिनचा न्यू हेअरकट डिट्टो डेव्हिडसारखा

व्हिड व व्हिक्टोरिया बेकहॅमचा मोठा मुलगा बु्रकलिन सध्या त्याच्या नव्या हेअरस्टाईलमुळे चर्चेत आहे. सोनेरी रंगाची छटा असणारे त्याचे थोडेसे लांब असणारे केस पाहून अनेकांना नव्वदच्या दशकतील डेव्हिडचा भास होतोय.

डेव्हिड-व्हिक्टोरियाच्या नात्याच्या सुरूवातीच्या काळात त्याची अशीच काहीशी हेअरस्टाईल होती. त्यावेळी दोघेही आपापल्या लोकप्रियतेच्या उच्च शिखरावर पोहचलेले होते. डेव्हिड मँचेस्टर युनायटेडचा स्टार फुटबॉलपटू तर ‘स्पाईस गर्ल’ म्हणून व्हिक्टोरिया प्रसिद्धी होती. एका चॅरिटी सामन्याच्या वेळी १९९७ मध्ये दोघांची भेट झाली होती आणि ते प्रेमात पडले.

                                              Brooklyn Beckham

नात्याविषयी सांगाताना डेव्हिड म्हणाला होता की, आमच्या रिलेशनशिपच्या सुरुवातीचे तीन महिने फार छान होते. कारण, त्यादरम्यान कोणालाच आमच्या नात्याबद्दल माहित नव्हते. आम्ही लपूनछपून फिरत असू. आमचा पहिला किस एका रेस्टॉरंटच्या पार्किंगमध्ये झाला.

                                              David Beckham, Victoria Beckham,

                                              David Beckham, Victoria Beckham

एकमेकांना जास्तीत वेळ देण्यासाठी आम्ही विविध ठिकाणी एकत्र जात असू. तो काळ खरंच खूप एक्सायटिंग होता. तुम्ही जेव्हा खऱ्या पडता, तेव्हा सगळंच अमेझिंग वाटू लागते. हे मला व्हिक्टोरिआसोबत राहून कळाले. दोन भेटीनंतर त्याने हिंमत करून तिचा नंबर घेतला होता. परंतु पहिल्याच भेटीत त्याने ‘करेन तर हिच्याशीच लग्न करेन’ अशी मनोमन प्रण केली होती.

१७ वर्षीय ब्रुकलिनसुद्धा रोमान्सच्या बाबतीत मागे नाही. दोन वर्षे तो अभिनेत्री क्लो मॉरेट्झसोबत रिलेशनशिपमध्ये होता. नुकतेच त्यांचे ब्रेक-अप झाले असून सध्या तो सिंगल आहे. अशी हेअरस्टाईल केल्यावर त्याला लवकरच त्याची ‘व्हिक्टोरिआ’ मिळावी अशी फॅन्सची इच्छा आहे.

Web Title: Brooklyn's New Haircut Like Dito David

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.