केट आणि बिस्मार्कचे अखेर ब्रेक-अप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 16:23 IST2016-10-18T16:23:32+5:302016-10-18T16:23:32+5:30
सुपरमॉडेल केट मॉसने बॉयफ्रेंड निकोलाय व्हॉन बिस्मार्कशी नाते तोडल्याचे कळतेय. गेले वर्षभर एकमेकांना डेट करणारे केट आणि निकोलाय यांच्यामध्ये ...

केट आणि बिस्मार्कचे अखेर ब्रेक-अप
स परमॉडेल केट मॉसने बॉयफ्रेंड निकोलाय व्हॉन बिस्मार्कशी नाते तोडल्याचे कळतेय. गेले वर्षभर एकमेकांना डेट करणारे केट आणि निकोलाय यांच्यामध्ये गेले काही दिवस खटके उडत होते. निकोलायचा हुल्लड स्वभाव केटला खूप खटकत होता. मौजमजा करण्यात सदैव गुंग असणाऱ्या निकोलायशी अखेर तिने ब्रेक-अप केले.
या कपलच्या जवळच्या मित्रानुसार ते दोघांचे नाते गेल्या काही महिन्यांपासून तुटण्याच्या मार्गावर होते. निकोलायचा पार्टी करण्याचा स्वभाव तिला मुळीच आवडत नसे. म्हणून दोघांत सतत वाद व्हायचे. नुकतेच दोघांचे कडाक्याचे भांडण झाले आणि तोच त्यांच्या नात्याचा शेवट ठरला.
एकेकाळी प्रेमांत आकांत बुडालेली ही जोडी तुटणार म्हणून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. एका मित्रानुसार, केट त्याच्या प्रेमात पुरती वेडी झाली होती. एकमेकांशिवाय ते दोघे कुठेच जात नसत. मात्र अलिकडच्या काळात त्यांच्यामध्ये हळूहळू दुरावा दिसू लागला. त्याचा स्वैराचारी स्वभावाचा तिला तिटकारा होता.
केटने त्याला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला परंतु निकोलायमध्ये काहीच बदल झाला नाही. ते दोघे मग वरच्यावर भांडू लागले. नंतर एकमेकांना टाळू लागले. पण नुकतेच त्यांचे कडाक्याचे भांडण झाले आणि ‘आता मला हे सहन नाही होत’ असे म्हणत केटने नाते संपुष्टात आणले.
सध्या तरी दोघे लवकर एकत्र येण्याच्या मार्गावर दिसत नाही. परंतु कटुता जाऊन दोघांमध्ये पुन्हा प्रेम फुलवावे अशीच चाहत्यांची इच्छा आहे. आणि तसेही हे वर्ष ‘बे्रक-अप इयर’ म्हणूनच ओळखले जातेय. ब्रॅड पिट-अँजेलिना जोली यांच्या घटस्फोटाने तर ते सिद्धच केले. तिकडे जॉनी डेपनेदेखील अॅम्बरशी असलेले लग्न मोडले. हॉलीवूड आणि बॉलीवूड असे दोन्हीकडे एकामागून एक नाती तुटत आहेत.