लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान ३० वर्षीय गायक कोसळला, हृदयविकाराच्या धक्क्याने जागीच निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 10:22 AM2023-12-15T10:22:43+5:302023-12-15T10:23:38+5:30

याचा व्हिडिओ कॅमेेऱ्यात कैद झाला आहे.

brazil singer Pedro Henrique suffered heart attack while performing live on stage died on spot | लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान ३० वर्षीय गायक कोसळला, हृदयविकाराच्या धक्क्याने जागीच निधन

लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान ३० वर्षीय गायक कोसळला, हृदयविकाराच्या धक्क्याने जागीच निधन

ब्राझीलमध्ये बुधवारी एक धक्कादायक घटना घडली. गॉस्पल सिंगर पेड्रो हेनरिकला (Pedro Henrique) लाईव्ह स्टेज परफॉर्मन्सवेळीच हृदयविकाराचा झटका आला. ३० वर्षीय पेड्रो बुधवारी ब्राझीलमधील एका धार्मिक इव्हेंटमध्ये परफॉर्म करत होता. गाणं गात असताना आणि प्रेक्षकांसोबत संवाद करत असताना तो एन्जॉय करत होता. मात्र अचानक तो जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध पडला. त्याचा जागीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. याचा व्हिडिओही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

व्हिडिओमध्ये गायक पेड्रो हेनरिक स्टेजवर कडेला गाणं गाताना दिसत आहे. प्रेक्षकही त्याच्या गाण्याला साद घालत आहेत. Vai ser Tao Lindo हे लोकप्रिय गाणं यावेळी गात होता. व्हाईट पँट आणि सूट असा त्याचा लूक होता. प्रेक्षकही त्याच्यासोबत सूर जुळवत होते. एक आलाप घेतल्यानंतर पेड्रो थोडावेळ थांबला. त्याने प्रेक्षकांसमोर माईक धरला आणि काही सेकंदातच तो स्टेजवर कोसळला. 

पेड्रोला कोसळल्याचं पाहून प्रेक्षकही काही क्षण अवाक झाले. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तोवर त्याचाी प्राणज्योत मालवली होती. परफॉर्मन्सच्या आधी त्याने मित्राला मी खूप थकलो आहे असे सांगितले होते . 

गायक पेड्रोच्या पश्चात त्याची पत्नी आणि एक मुलगी आहे. तीन वर्षांचा असतानाच पेड्रोने गाण्याची सुरुवात केली होती. 2015 मध्ये युट्यूबवर अनेक व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याची लोकप्रियता वाढली. यानंतर त्याने एका लोकल बँडमध्ये प्रवेश केला. तर २०१९ नंतर त्याने सोलो परफॉर्मन्सला सुरुवात केली. गुरुवारी तो आपल्या युट्यूब चॅनलवर एक नवा प्रोजेक्ट आणणार होता.

Web Title: brazil singer Pedro Henrique suffered heart attack while performing live on stage died on spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.