​हॉलीवूड दिग्दर्शकाच्या बायकोला बॉलीवूडचे वेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 15:45 IST2016-12-04T15:45:18+5:302016-12-04T15:45:18+5:30

बॉलीवूड सेलिब्रेटींना हॉलीवूडचे वेध असणे आपण समजू शकतो. परंतु हॉलीवूडमध्ये एक सेलिब्रेटी अशी आहे जी हिंदी चित्रपटांची खूप मोठी ...

Bollywood director's wife | ​हॉलीवूड दिग्दर्शकाच्या बायकोला बॉलीवूडचे वेड

​हॉलीवूड दिग्दर्शकाच्या बायकोला बॉलीवूडचे वेड

लीवूड सेलिब्रेटींना हॉलीवूडचे वेध असणे आपण समजू शकतो. परंतु हॉलीवूडमध्ये एक सेलिब्रेटी अशी आहे जी हिंदी चित्रपटांची खूप मोठी चाहती आहे.

ती सेलिब्रेटी म्हणजे प्रसिद्ध हॉलीवूड दिग्दर्शक पॉल फिग यांची पत्नी लॉरी. भव्यता आणि मनोरंजानाचे मिश्रण म्हणजे बॉलीवूड फिल्म्स, असे ती हिंदी चित्रपटांचे वर्णन करते. 

‘घोस्टबस्टर्स’ आणि ‘ब्राईडस्मेडस्’ दिग्दर्शक पॉल फिगलादेखील लॉरीआग्रह करून बॉलीवूड चित्रपट दाखवत असते. नुकतेच पत्नीच्या ‘दबावा’खाली शाहरुख-आलिया स्टारर ‘डिअर जिंदगी’ हा चित्रपट पाहिला.

चित्रपट पाहून पॉल एवढा प्रभावित झाला की, त्याने ट्विटरवर चित्रपटातील कलाकार आणि सिनेमाचे मनमोकळे कौतुक केले. त्याने लिहिले की, ‘शाहरुख आणि आलियाचा अभिनय अतिशय सुंदर आहे. गौरी शिंदे ही एक उत्तम -लेखिका आहे.’


डिअर जिंदगी : शाहरुख खान आणि आलिया भट्ट

स्वत: पॉलकडून कौतुकाची थाप मिळाली म्हटल्यावर ‘डिअर जिंदगी’च्या टीमचा हुरूप वाढला. निर्माता करण जोहर आणि शाहरुखने लागलीच त्याला ट्विट करून धन्यवाद दिले. बरं पॉल आणि लॉरीचे बॉलीवूड प्रेम येथेच एवढ्यावरच थांबलेले नाही.

लॉरीने ट्विट केले की, ‘आता मला आदित्या चोप्रा दिग्दर्शित ‘बेफिक्रे’ पाहण्याची उत्सुकता लागली आहे’. चला म्हणजे विदेशातील सेलिब्रेटीदेखील आता हिंदी चित्रपटांकडे नीट लक्ष देतात तर!

Web Title: Bollywood director's wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.