BIRTHDAY SPECIAL : लिओनार्दो डिकॅप्रिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 11:37 IST2016-11-11T11:23:42+5:302016-11-11T11:37:31+5:30

लिओबद्दल जाणून घ्या या १५ रंजक गोष्टी.

BIRTHDAY SPECIAL: Leonardo DiCaprio | BIRTHDAY SPECIAL : लिओनार्दो डिकॅप्रिओ

BIRTHDAY SPECIAL : लिओनार्दो डिकॅप्रिओ

लीवूड हार्टथ्रोब लिओनार्दो डिकॅप्रिओचा आज ४२ वा वाढदिवस. ‘धिस बॉयज् लाईफ’ ते ‘रेव्हनंट’पर्यंतचा त्याचा देदिप्यमान प्रवास पाहून कोणालाही हेवा वाटेल. पाच नामांकनानंतर अखेर त्याने यावर्षी आॅस्कर पुरस्कारांवर बाजी मारली. जगातील सर्वाधिक ओळखला जाणारा चेहरा आणि बॉक्स आॅफिस मॅग्नेट म्हणून बिरुदावली मिरवणाऱ्या लिओबद्दल जाणून घ्या या १५ रंजक गोष्टी.

१. लिओचा पहिला चित्रपट ‘धिस बॉयज् लाईफ’ नसून ‘क्रिटर्स ३’ आहे.

२. रॉबर्ट डी निरोंनी स्वत: जातीने उपस्थित राहून शेकडो मुलांमधून लिओची ‘धिस बॉयज् लाईफ’साठी निवड केली होती.

३. हाडाचा पर्यावरणवादी असलेल्या लिओला समुळ नष्ट होण्याचा धोका असणाऱ्या बहुतांश झाडांच्या प्रजातींचे नावे मुखपाठ आहेत.

४. त्याने आतापर्यंत कधीच ड्रग्स घेतलेले नाही. त्यामुळे ‘वुल्फ आॅफ वॉल स्ट्रीट’मधील भूमिका समजून घेण्यासाठी त्याने ड्रग तज्ज्ञांची मदत घेतली.

५. याच चित्रपटातील भूमिकेच्या तयारीसाठी लिओ आणि जोनाह हिलने ‘ड्रंकेस्ट मॅन इन द वर्ल्ड’ नावाचा पुढील व्हिडिओ पाहिला होता.

                                  

६. लहान असताना त्याने ‘युनिव्हर्सिटी इलेमेन्टरी स्कूल’ नावाच्या प्रायोगिक शाळेत शिक्षण घेतले होते. आज तिला ‘युसीएलअ लॅब स्कूल’ म्हणून ओळखले जाते.

७. तो पोटात असताना त्याची आई इर्मेलिन इटलीमध्ये प्रसिद्ध चित्रकर लिओनार्दो दा विंची यांची पेंटिग बघत होती. त्याचवेळी त्याने पोटात सर्वप्रथम पाय मारला. म्हणून त्याचे नाव ठेवले लिओनार्दो.

८. ‘व्हॉट्स इटिंग गिल्बर्ट ग्रेप’मधील अर्नी ग्रेपच्या भूमिकेसाठी त्याला वयाच्या १९ व्या वर्षी पहिले आॅस्कर नामांकन मिळाले होते.

९. अमेरिकेत सुमारे ७ टक्के तरुण मुलींनी ‘टायटॅनिक’ प्रदर्शित झाल्यावर पहिल्या ५ आठवड्यात किमान दोनदा पाहिला होता.

१०. आतापर्यंत एकाही सिक्वेल चित्रपटात काम न करता तो सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता आहे.

११. त्याच्याबद्दल ‘अदर मॅन’ नावाचे फॅन फिक्शन उपलब्घ आहे.

                                
                                लिओचे आईवडिल : जॉर्ज डिकॅप्रिओ, लिओ आणि इर्मेलिन इंडेबर्केन

१२. ग्रेस कॅटालॅनो नावाच्या लेखिकेने लिओने वयाची पंचविशी गाठण्या आधीच त्याच्याविषयी दोन पुस्तके लिहिलेली आहेत.

१३. बेनेडिक्ट कम्बरबॅचच्या आधी ‘द इमिटेशन गेम’ चित्रपटातील अ‍ॅलन ट्युरिंगची भूूमिका लिओ करणार होता.

१४. आपल्या ४० व्या वाढदिवासानिमित्त त्याने दिलेल्या चॅरिटी पार्टीतून  पर्यावरण संरक्षणासाठी सुमारे ३ मिलियन डॉलर्सची मदत जमा करण्यात आली.

१५. वयाच्या पाचव्या वर्षी तो प्रथम ‘रॉम्पर रूम’ नावाच्या टीव्ही शोमध्ये दिसला होता.

Web Title: BIRTHDAY SPECIAL: Leonardo DiCaprio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.