‘बेवॉच’चा ट्रेलर रिलिज : प्रियंकाची झलक मात्र सेकंदापुरतीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 20:35 IST2016-12-09T20:15:04+5:302016-12-09T20:35:37+5:30
बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये डेब्यू करीत असलेल्या अभिनेत्री प्रियंका चोपडा हिच्या बहुचर्चित ‘बेवॉच’ या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच रिलिज करण्यात आले आहे; परंतु ट्रेलरमध्ये प्रियंकाची झलक काही सेकंदापुरतीच असल्याने तिच्या फॅन्सची घोर निराशा झाली असेल यात दुमत नाही. कारण दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये प्रियंकाची एकच झलक असून, ती काही सेकंदाची आहे.

‘बेवॉच’चा ट्रेलर रिलिज : प्रियंकाची झलक मात्र सेकंदापुरतीच
ब लिवूडमधून हॉलिवूडमध्ये डेब्यू करीत असलेल्या अभिनेत्री प्रियंका चोपडा हिच्या बहुचर्चित ‘बेवॉच’ या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच रिलिज करण्यात आले आहे; परंतु ट्रेलरमध्ये प्रियंकाची झलक काही सेकंदापुरतीच असल्याने तिच्या फॅन्सची घोर निराशा झाली असेल यात दुमत नाही. कारण दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये प्रियंकाची एकच झलक असून, ती काही सेकंदाची आहे.
अमेरिकी टीव्ही शो ‘क्वाटिंको’मधून हॉलिवूडमध्ये लोकप्रिय झालेल्या प्रियंकाला ‘बेवॉच’मधून हॉलिवूडपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे साहजिकच तिच्या या पहिल्या-वहिल्या हॉलिवूडपटाची प्रेक्षकांना आतुरतेने प्रतीक्षा आहे. ट्रेलरमधून जरी त्यांची काहीशी प्रतीक्षा संपली असली तरी, त्यात प्रियंकाची झलक काही सेकंदापुरतीच असल्याने फॅन्सची निराशा झाली नसेल तरच नवल.
१ मिनिट ५९ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये ना प्रियंकाचा डायलॉग दाखविला ना तिच्या अदा. इतर कलाकार मात्र डायलॉग बोलताना बघावयास मिळत असल्याने चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबाबत काहीसा अंदाज बांधणे शक्य होते.
ट्रेलरमध्ये सुरुवातीला भरपूर अॅक्सन सीन दाखविण्यात आले आहेत, मात्र जॅक एफ्रोन ज्या कॉमेडी अंदाजात एंट्री मारतो त्यावरून चित्रपटाच्या थीमचा अंदाज बांधणे शक्य होते. अशातही एक बाब मात्र नक्कीच म्हणावी लागेल की, काही सेंकदाच्या या झलकमध्ये प्रियंका जबरदस्त हॉट दिसत आहे. चित्रपटात तिचा अंदाज बघण्यासारखा असेल यात शंका नाही.
दरम्यान प्रियंका व डवायन यानी चित्रपटाचे ट्रेलर ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. हा चित्रपट २६ मे २०१७ रोजी रिलिज होणार आहे.

You see them as the ‘Lifeguard Squad',I see them as prey!Enjoy the sun while u can coz this beach is mine.So step aside& #Wait4VictoriaLeedspic.twitter.com/H5Nr78087B— PRIYANKA (@priyankachopra) December 8, 2016}}}} ">http://
}}}} ">You see them as the ‘Lifeguard Squad',I see them as prey!Enjoy the sun while u can coz this beach is mine.So step aside& #Wait4VictoriaLeedspic.twitter.com/H5Nr78087B— PRIYANKA (@priyankachopra) December 8, 2016
You see them as the ‘Lifeguard Squad',I see them as prey!Enjoy the sun while u can coz this beach is mine.So step aside& #Wait4VictoriaLeedspic.twitter.com/H5Nr78087B— PRIYANKA (@priyankachopra) December 8, 2016
दरम्यान प्रियंका व डवायन यानी चित्रपटाचे ट्रेलर ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. हा चित्रपट २६ मे २०१७ रोजी रिलिज होणार आहे.