एडलेला ‘या’ कारणामुळे करावी लागली कॉन्सर्ट रद्द!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 16:13 IST2017-03-15T10:42:02+5:302017-03-15T16:13:09+5:30
काही दिवसांपूर्वीच मच्छरांच्या भीतीमुळे लाइव्ह कॉन्सर्टमधून पोबारा केलेल्या गायिका एडले हिला यावेळेस एका वेगळ्याच कारणाने कॉन्सर्ट रद्द करावी लागली. ...
.jpg)
एडलेला ‘या’ कारणामुळे करावी लागली कॉन्सर्ट रद्द!
क ही दिवसांपूर्वीच मच्छरांच्या भीतीमुळे लाइव्ह कॉन्सर्टमधून पोबारा केलेल्या गायिका एडले हिला यावेळेस एका वेगळ्याच कारणाने कॉन्सर्ट रद्द करावी लागली. त्याचे झाले असे की, एडलेच्या एका फॅन्सला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने तिने सिडनी (आॅस्ट्रेलिया) येथे होणारा कार्यक्रम रद्द केला.
डेली मिररने दिलेल्या माहितीनुसार सिडनी येथे ग्रॅमी पुरस्कार विजेती गायिका एडले हिच्या लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन केले होते. परंतु कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या एका ४७ वर्षीय महिला फॅन्सला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने तिला कॉन्सर्ट रद्द करावी लागली. त्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल कररण्यात आले.
सिडनी येथील एएनझेड स्टेडिअममध्ये आयोजित केलेल्या या कॉन्सर्टसाठी ९५ हजार प्रेक्षक उपस्थित होते. अशातही त्या महिलेची प्रकृती बिघडल्याची वार्ता वाºयासारखी पसरली. नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवित याबाबतची माहिती आयोजकांना कळविली. त्यांनी घटनास्थळी अॅम्ब्युलन्सला पाचारण केले. सर्व नागरिकांनी अॅम्ब्युलन्सला वाट मोकळी करून दिली, ज्यामुळे त्या महिलेला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करणे शक्य झाले.
परंतु या घटनेमुळे एडले खूपच व्यतित झाली. तिने कॉन्सर्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षदर्शी मेग रेलान्सने सांगितले की, एडलेला कॉन्सर्ट रद्द करावी लागल्याचे दु:ख वाटते; मात्र तिने घेतलेला निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे. तिने कॉन्सर्ट रद्द करून चाहत्यांच्या मनातील तिचे स्थान आणखी घट्ट केले आहे. दरम्यान, एडलेच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, सोशल मीडियावर चाहते तिचे आभार मानत आहेत.