​यामुळे जेनिफर लॉरेन्सला वाटायची मूल न होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2017 14:16 IST2017-01-02T14:16:54+5:302017-01-02T14:16:54+5:30

जेनिफर लॉरेन्ससारखे यश मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असेल. एवढ्या कमी वयात तिने जे अफाट यश कमावले आहे ते ...

Because of this, Jennifer Lawrence fears not being a child | ​यामुळे जेनिफर लॉरेन्सला वाटायची मूल न होण्याची भीती

​यामुळे जेनिफर लॉरेन्सला वाटायची मूल न होण्याची भीती

निफर लॉरेन्ससारखे यश मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असेल. एवढ्या कमी वयात तिने जे अफाट यश कमावले आहे ते पाहून प्रत्येकालाच अभिमान वाटेल. एवढी सुपर सक्सेसफुल असूनही तिला मात्र काही गोष्टींची भीती वाटते आणि त्या भीतीच्या मागचे कारणही फार मजेशीर आहे.

आपल्या प्रत्येक भूमिकेत प्राण फुं कणाऱ्या जेनिफरला ‘पॅसेंजर्स’सारख्या साय-फाय अ‍ॅडव्हेंचर-अ‍ॅक्शन सिनेमात काम करणे फार अवघड गेले. कारण तिला स्टंट करताना घालावे लागणाऱ्या हार्नेसची फार भीती वाटते. तिने जर हार्नेस घातले तर तिला कधीच मुलबाळ होणार नाही, अशी भीत तिच्या मनात आहे.

आश्चर्य वाटले ना? नुकतेच तिने सांगितले की, ‘अ‍ॅक्शन सीन्सची शूटींग करताना हार्नेस घालण्याची मला प्रचंड भीती वाटते. ते घातल्याने माझी मुलांना जन्म देण्याची क्षमता कमी होऊन जाईल, असा माझा समज बनला आहे.  म्हणून तर कित्येकदा क्रिस प्रॅटला अनेक स्टंट एकट्याला करावे लागले.’

तिच्या भीतीच्या वृत्ताला दुजोरा देत को-स्टार क्रिस म्हणाला की, शूटींग दरम्यान संपूर्ण एक आठवडा असा होता जेव्हा मी एकदम जड स्पेस सुट घालून हार्नेस लावून हवेत लटक लेला असायचो. खूप अवघड स्थितीमध्ये मी अडकलेलो असायचो. आमच्या क्रू  मेंबर्सना मी सांगायचो की, मित्रांनो तुम्ही पटकन हे संपवा. सगळं काम आपल्यालाच करायचे आहे. जेनिफर आपल्या मदतीला येणार नाही.

‘पॅसेंजर्स’मध्ये क्रिस आणि जेनिफरचा अंतराळ प्रवासादरम्यानचा रोमांन्स पाहायला मिळणार आहे. चित्रपटात अत्यंत उच्च दर्जाचे व्हिएफएक्स इफेक्टस् पाहायला मिळणार असून स्पेस मुव्हीजचे चाहते आतूरतेने त्याची वाट पाहत आहेत. येत्या ६ जानेवारी रोजी ‘पॅसेंजर्स’ ‘३-डी’मध्ये हिंदी, तमिळ, इंग्रजी आणि तेलुगू अशा चार भाषांमधून रिलीज होतोय.

Web Title: Because of this, Jennifer Lawrence fears not being a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.