BATMAN MOVIE: बेन अ‍ॅफ्लेकने वैतागून सोडून दिला ‘बॅटमॅन’ चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 19:37 IST2017-02-02T14:07:48+5:302017-02-02T19:37:48+5:30

काही चित्रपट किंवा पात्रे प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरलेली असतात. त्यांच्या पावित्र्याला कोणी धक्का पोहचवणे त्यांना मुळीच आवडत नसते. म्हणून ...

BATMAN MOVIE: Ben Affleck quits 'Betamen' movie! | BATMAN MOVIE: बेन अ‍ॅफ्लेकने वैतागून सोडून दिला ‘बॅटमॅन’ चित्रपट!

BATMAN MOVIE: बेन अ‍ॅफ्लेकने वैतागून सोडून दिला ‘बॅटमॅन’ चित्रपट!

ही चित्रपट किंवा पात्रे प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरलेली असतात. त्यांच्या पावित्र्याला कोणी धक्का पोहचवणे त्यांना मुळीच आवडत नसते. म्हणून तर  क्रिस्टियन बेलने आदर्श ‘बॅटमॅन’ साकरल्यानंतर दुसऱ्या कलाकाराला त्याच्या रुपात पाहणे चाहत्यांना जरा अवघडच गेले.

मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बॅटमॅन वि. सुपरमॅन’ चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सिनेमात ‘बॅटमॅन’ची भूमिका करणारा अभिनेता बेन अ‍ॅफ्लेकवर अनेकांनी टीका केली. पण यामूळे त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. उलट सर्वांना आश्चर्याचा धक्का देत त्याने काही महिन्यांपूर्वी घोषणा केली होती की, पुढचा बॅटमॅन चित्रपट तो स्वत: दिग्दर्शित करणार आहे.

ALSO READ: यशस्वी कलाकार बेन अ‍ॅफ्लेकला कशाचा होतोय पश्चात्ताप?

हे ऐकून मात्र डाय हार्ड बॅटमॅन चाहते पेटून उठले. सोशल मीडियावर या निर्णयावर फार टीका झाली. आणि नुकतेच अ‍ॅफ्लेकने स्वत: निर्णय मागे घेत सांगितले की, तो आता बॅटमॅन चित्रपट दिग्दर्शित करणार नाही. 

असे मन बदलण्याचे कारण काय?

तो म्हणतो, ‘नुकताच मी ‘लिव्ह बाय नाईट’ नावाचा चित्रपट बनवला. तो लिहिण्यासाठी मला दोन वर्षे लागले. त्याच्या प्रोमोशनसाठी मी जेथे जेथे जायचो तेथे लोक मला फक्त ‘बॅटमॅन, बॅटमॅन, बॅटमॅन’ विषयी विचारले जायचे. मला वाटायचे, अरे कोणी तरी ‘लिव्ह बाय नाईट’विषयी बोला; पण नाही, सगळ्यांना उत्सुकता केवळ बॅटमॅनचीच.’

► ALSO READ:​ बेन अ‍ॅफ्लेक करतोय सिएना मिलरचे तोंडभरून कौतुक​

या सगळ्या हाईपला कंटाळून त्याने दिग्दर्शनातून माघार घेऊन केवळ अभिनयावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले. तो सांगातो, ‘बॅटमॅन’सारखे कठिण पात्र साकारताना तुम्हाला तुमचे संपूर्ण द्यावे लागते. तुमची सगळी शक्ती, विचार, लक्ष भूमिकेसाठी देणे गरजेचे असते. दिग्दर्शनाची अतिरिक्त जबाबादारी खांद्यावर असताना मी भूमिकेला योग्य न्याय देऊ शकणार नाही असे मला वाटते. म्हणून सगळ्यांच्या विचाराने मी केवळ अभिनयाकडे लक्ष देण्याचे ठरवले.’

अनेक हॉलीवूड ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये काम केलेल्या बेनने दिग्दर्शक म्हणूनही छाप पाडलेली आहे. २०१२ साली त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘अर्गो’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा आॅस्कर मिळाला होता. 

Web Title: BATMAN MOVIE: Ben Affleck quits 'Betamen' movie!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.