BAFTAS 2017: देव पटेल ठरला ‘सरप्राईज’ विजेता; ‘ला ला लँड’चा दबदबा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 12:33 IST2017-02-13T07:03:22+5:302017-02-13T12:33:22+5:30

इंग्लंडमध्ये सिनेमांसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार सोहळा ‘बाफ्टा’ नुकताच पार पडला. अपेक्षेप्रमाणे रायन गोस्लिंग आणि एमा स्टोन स्टारर ‘ला ...

BAFTAS 2017: God will prove to be 'Surprise' winner; The 'la la land' continues to dominate | BAFTAS 2017: देव पटेल ठरला ‘सरप्राईज’ विजेता; ‘ला ला लँड’चा दबदबा कायम

BAFTAS 2017: देव पटेल ठरला ‘सरप्राईज’ विजेता; ‘ला ला लँड’चा दबदबा कायम

ग्लंडमध्ये सिनेमांसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार सोहळा ‘बाफ्टा’ नुकताच पार पडला. अपेक्षेप्रमाणे रायन गोस्लिंग आणि एमा स्टोन स्टारर ‘ला ला लँड’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह पाच पुरस्कारांवर नाव कोरले. परंतु या सोहळ्याचा सर्वात ‘सरप्राईजिंग’ विजय ठरला तो भारीतय वंशाचा ब्रिटिश अभिनेता देव पटेलचा.

‘लायन’ चित्रपटातील ‘सरू ब्रिअर्ली’ या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याचा ‘बाफ्टा’ पुरस्कार त्याला मिळाला. लहानपणी आॅस्ट्रेलियामध्ये दत्तक घेतलेला आणि मोठेपणी भारतात आपल्या खऱ्या आईवडिलांचा शोध घेणाऱ्या मुलाच्या सत्यकथेवर आधारित या सिनेमासाठी देव पटेल दोन आठवड्यांनी होणाऱ्या आॅस्कर पुरस्कारांमध्येसुद्धा ‘बेस्ट सपोर्टेड अ‍ॅक्टर’ म्हणून नामांकित आहे.

पुरस्कार स्वीकारताना तो भावूकपणे म्हणाला की, ‘हे खरंच घडलंय यावर माझा विश्वासच बसत नाही. सीमा, वंश, वर्ण यांच्या पलीकडे जाणाऱ्या प्रेमाची ही गोष्ट आहे. हा त्या प्रेमाचा विजय आहे. माझ्या कुटुंबियांसोबत मिळून मी टीव्हीवर हा पुरस्कार सोहळा पाहायचो. आणि आता मला तो पुरस्कार मिळतोय म्हटल्यावर माझ्यासाठी ही स्वप्नवत अवस्था आहे.’ चित्रपटात त्याच्या बालपणाची भूमिका करणारा बालकलाकार सनी पवारसोबत तो हा अवॉर्ड शेअर करणार असल्याचे त्याने सांगितले.

CAsey
बाफ्टा २०१७ | बेस्ट अ‍ॅक्टर : केसी अ‍ॅफ्लेक (मँचेस्टर बाय द सी)

Emma
बाफ्टा २०१७ | बेस्ट अ‍ॅक्ट्रेस: एमा स्टोन (ल ला लँड)

Voila Davis
बाफ्टा २०१७ | बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेस : वॉयोला डेव्हिस (फेन्सेस)

Damien
बाफ्टा २०१७ | बेस्ट डिरेक्टर : डेमियन चॅझेल (ला ला लँड)

‘मँचेस्टर बाय द सी’ या चित्रपटातील जबरदस्त अभिनयासाठी केसी अ‍ॅफ्लेक सर्वोत्तम अभिनेत्याचा मानकरी ठरला. त्याने राय गोस्लिंगला पछाडत बेस्ट अ‍ॅक्टर बाफ्टा पटकावला. ‘ला ला लँड’साठी एमा स्टोन सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्री तर ‘फेन्सेस’ चित्रपटासाठी वॉयोला डेव्हिस बेस्ट सपोर्टेड अ‍ॅक्ट्रेस ठरली. सर्वोत्कृ ष्ट पटकथा म्हणून गंभीर फॅमिली ड्रामा ‘मँचेस्टर बाय द सी’ची निवड करण्यात आली.

‘द युके अवॉर्ड्स’ म्हणूनही ओळखला जाणारा ‘बाफ्टा’ पुरस्कार आॅस्करमध्ये कोणी बाजी मारेल याचे सूचक मानले जातात. १४ आॅस्कर नामांकनांसह आघाडी घेतलेल्या ‘ला ला लँड’ने ७ गोल्डन ग्लोब आणि आता ५ बाफ्टा पुरस्कारांवर मोहर उमटवून आपली आॅस्कर दावेदारी आणखी मजबूत केली.

ALSO READ: ​‘लायन’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी डोनाल्ड ट्रम्पविरोधात छापली ‘जाहिरात’

Web Title: BAFTAS 2017: God will prove to be 'Surprise' winner; The 'la la land' continues to dominate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.