अवतार बेबीजची इंटरनेटवर धूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 19:35 IST2016-11-10T19:29:01+5:302016-11-10T19:35:21+5:30

​एक वेगळी आणि रोमांचक दुनिया दाखवून प्रेक्षकांमध्ये अशाही दुनियेचे अस्तित्त्व असू शकते असा भास निर्माण करणाºया ‘अवतार’ या हॉलिवूडपटाने प्रेक्षकांना वेड लावले होते. आता याच दुनियेत काही बच्चे कंपनी अवतरली असून, या ‘अवतार बेबीज’ने इंटरनेट विश्वात धूम उडवून दिली आहे.

Avatar babies on the internet | अवतार बेबीजची इंटरनेटवर धूम

अवतार बेबीजची इंटरनेटवर धूम

वेगळी आणि रोमांचक दुनिया दाखवून प्रेक्षकांमध्ये अशाही दुनियेचे अस्तित्त्व असू शकते असा भास निर्माण करणाºया ‘अवतार’ या हॉलिवूडपटाने प्रेक्षकांना वेड लावले होते. आता याच दुनियेत काही बच्चे कंपनी अवतरली असून, या ‘अवतार बेबीज’ने इंटरनेट विश्वात धूम उडवून दिली आहे. 


गेल्या काही दिवसांपासून या अवतार बेबीजचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले जात असून, नेटीझन्सकडून त्यास तुफान लाईक्स मिळत आहेत. कोणाला क्यूट तर कोणाला हे फोटो वेगळ्या दुनियेचा भास निर्माण करून देणारे ठरत आहे. याबाबतचे काही व्हिडीओही अपलोड केले असून, आतापर्यंत २.४ दशलक्ष नेटीझन्सनी हे व्हिडीओ पाहिले आहेत. 


अशा प्रकारच्या बेबीज बनविण्याचा कारनामा स्पेनच्या एका कंपनीने केला आहे. वास्तविक ही कंपनी अशाप्रकारच्या डॉल अथवा बेबी बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. कारण ही कंपनी सुपर-रिअलिस्टिक बेबीज बनवित असते. विशेष म्हणजे या बेबीज खरेदी करता येतात. मात्र याची किंमत प्रचंड आहे. जवळपास २००० यूएस डॉलर अशी या बेबीजची किंमत आहे. 


‘अवतार’ या हॉलिवूडपटात एका वेगळ्या दुनियेला दाखविण्यात आले होते. ज्या पद्धतीचे पात्र यात रंगविले होते, तशाच काही डॉल बनविल्या असल्याने त्या ‘अवतार बेबीज’ नावाने इंटरनेटवर हिट ठरत आहेत. या बेबीजची रचना अतिशय सुरेख अशा पद्धतीने करण्यात आली आहे. नाक, डोळे, तोंड, शेपूट खूपच आकर्षक असल्याने त्या जिवंत तर नाहीत ना असाही भास झाल्याशिवाय राहत नाही. इंटरनेटवर सर्वाधिक अवतार बेबी सर्च केल्या जात आहे. 


अवतार सिरीजचा चित्रपट लवकरच रिलिज केला जाणार असल्याने या बेबीजविषयीची उत्सुकता वाढत आहे. 

Web Title: Avatar babies on the internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.