घटस्फोटासाठी अॅँजेलिनाकडून वकिलांची टीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 17:26 IST2016-10-17T17:26:48+5:302016-10-17T17:26:48+5:30
हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीने पती ब्रॅड पीटसोबत घटस्फोट घेण्यासाठी दोन तगड्या वकिलांची नियुक्ती केली आहे. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ...

घटस्फोटासाठी अॅँजेलिनाकडून वकिलांची टीम
ह लिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीने पती ब्रॅड पीटसोबत घटस्फोट घेण्यासाठी दोन तगड्या वकिलांची नियुक्ती केली आहे. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार अँजेलिनाने घटस्फोटासाठी कोणतीही कसूर राहू नये यासाठी बर्ट फील्ड्स आणि पियर्स ओडॉनेल या दोन तज्ज्ञ वकिलांची निवड केली. ब्रॅड पीटच्या मोबाईलमध्ये सेलेना गोमेझसह अनेक मुलींचे फोटो जोलीला आढळून आले. याच कारणामुळे तिने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचे समजते. ब्रॅडच्या मोबाईलमध्ये असंख्य मुलींचे फोटो होते. यामध्ये फ्लाईट अटेंडन्सपासून ते बाइकर्स बेबपर्यंत आणि हॉलिवूड तारका सेलेना गोमेझपर्यंतचे फोटो जोलीला आढळून आले. ब्रॅडवरती मुली मरतात हे जोलीला माहिती होते. पण त्यांचे फोटो त्याने मोबाईलमध्ये का जपून ठेवले याबद्दल जोलीच्या मनात संशय निर्माण झाला आणि तिने यावर वाद घालत ब्रॅडशी असलेला संसार मोडल्याचे सूत्राने सांगितले. यापूर्वी सेलिब्रेटी घटस्फोटात तज्ज्ञ असलेल्या लॉरा वेन्सर यांची वकील म्हणून नियुक्ती केली आहे. ब्रॅट पीटसोबत एंजेलिनाचा २०१४ मध्ये विवाह झाला होता.