...अन् जस्टिन बीबर फॅन्सवर संतापला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 15:32 IST2017-03-15T10:02:40+5:302017-03-15T15:32:40+5:30

मे महिन्यात भारतात येणारा पॉप स्टार जस्टिन बीबर सध्या त्याच्या फॅन्समुळे त्रस्त आहे. फॅन्सकडून सातत्याने होणाºया डिमांडमुळे जस्टिन वैतागला ...

... and Justin Beber fanes angry! | ...अन् जस्टिन बीबर फॅन्सवर संतापला!

...अन् जस्टिन बीबर फॅन्सवर संतापला!

महिन्यात भारतात येणारा पॉप स्टार जस्टिन बीबर सध्या त्याच्या फॅन्समुळे त्रस्त आहे. फॅन्सकडून सातत्याने होणाºया डिमांडमुळे जस्टिन वैतागला असून, तो फॅन्समध्ये जाणे सध्या टाळत आहे. अशातही एका महिला फॅन्सने त्याला गाठल्याने जस्टिनचा तोल गेला अन् त्याने त्या महिला फॅन्सला चांगलेच खडेबोल सुनावले. 

कॉन्टेक म्युझिकने दिलेल्या माहितीनुसार ‘सिडनी (आॅस्ट्रेलिया) येथील २० वर्षीय महिला फॅन्सने जस्टिनसोबत फोटो काढण्याचा तगादा लावला होता. ती सारखी त्याला फोटोसाठी आग्रह करीत होती. याच कारणाने जस्टिनचा तोल ढळला अन् त्याने त्या महिला फॅन्सला चांगलेच खडेबोल सुनावले. त्याचबरोबर जाहीर नाराजीही प्रकट केली. 



जस्टिनचा हा अवतार बघून ती महिला फॅन्स तेथून रडत-रडत निघून गेली. यावेळी बीबरने म्हटले की, तुम्ही माझ्या व्यक्तिगत मताच्या विरोधात जाऊ शकत नाही. मी कोणासोबत फोटो काढायचा हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. अशात तुम्ही मला त्याचा सारखा तगदा लावून क्रोधीत करत आहात. मला जर फोटो काढायचा नसेल तर तुमचा अशाप्रकारचा आग्रह चुकीचा असल्याचेही जस्टिनने सांगितले. 

तर सबाहची आई हाउदा बेबनाउइ यांनी द हेराल्ड सनशी बोलताना म्हटले की, माझी मुलगी जोरजोरात रडत होती. ती जस्टिनची डाय हार्ड फॅन असून, केव्हापासून त्याला भेटण्यासाठी तिची धडपड सुरू होती. अशात जस्टिनने तिला अपमानित केले. आता माझी मुलगी कधीही त्याच्या कॉन्सर्टला जाणार नाही. तसेच त्याचे गाणेही ऐकणार नाही. गायक-गीतकार ऐडलेने नुकतेच सिडनी येथे झालेल्या कॉन्सर्टमध्ये फॅन्सच्या टीकेचा सामना करीत असलेल्या जस्टिन बीबरचा बचाव केला होता. मात्र आता पुन्हा त्याच्यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली जात असल्याने तो चर्चेत आला आहे. 

Web Title: ... and Justin Beber fanes angry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.