​अ‍ॅनाला वाटते केट बेकिन्सेल सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 14:58 IST2016-11-24T14:56:09+5:302016-11-24T14:58:02+5:30

‘अंडरवर्ल्ड : ब्लड वॉर्स’ २ डिसेंबर रोजी हिंदी, इंग्लिश, तमिळ आणि तेलगु भाषांत प्रदर्शित होत आहे.

Ana Seems, Kate Beckinsell's Best Actress | ​अ‍ॅनाला वाटते केट बेकिन्सेल सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

​अ‍ॅनाला वाटते केट बेकिन्सेल सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

हॅम्पायर आणि वेअरवुल्फच्या अचाट दुनियेची मोहिनी आता भारतीय प्रेक्षकांनाही पडलेली आहे. ‘अंडरवर्ल्ड : ब्लडवॉर्स ३डी’ या ‘अंडरवर्ल्ड’ सिरीजमधील पाचव्या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

गॉथिक-मध्ययुगीत काळातील संघर्षाच्या केंद्रस्थानी असणारी सेलिना अर्थातच केट बेकिन्सेलचे दिग्दर्शिका अ‍ॅना फोर्स्टर कौतुक करताना म्हणते की, मी आतापर्यंत काम केलेल्या सर्व अभिनेत्रींमध्ये मला केट सर्वोत्कृष्ट वाटते.

आता तिच्या या कौतुकवर्षावास केटदेखील पात्र आहे. पहिल्या चार भागांमध्ये तिने केलेल्या असाधारण अभिनयामुळे ही सिरीज अद्यापही सक्रीय आहे. अ‍ॅना सांगते, ‘केट खुप बुद्धिमान आणि कुशल अभिनेत्री आहे. भूमिकेचे नवनवीन कांगोरे धुंडाळण्याची तिची क्षमता आणि उत्साह पाहता केवळ तिच्यामुळेच हा चित्रपट तयार करणे शक्य झाले.’


द किलर ब्युटी : केट बेकिन्सेल

यापूर्वीच्या चारही चित्रपटांपेक्षा ‘ब्लडवॉर्स’मध्ये अधिक जबरदस्त अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. सेलिनासमोरचा आतापर्यंतचा सर्वात मोठा अडथळा या चित्रपटात असणार आहे. त्यानुसार ती अधिक उग्र, अधिक आक्रमक आणि कुणाचीही तमा न बाळगणारी शुर-वीर सेलिना दिसणार आहे.

‘अंडरवर्ल्ड : ब्लड वॉर्स’ २ डिसेंबर रोजी हिंदी, इंग्लिश, तमिळ आणि तेलगु भाषांत प्रदर्शित होत आहे. यापूर्वी २०१२ मध्ये आलेल्या ‘अंडरवर्ल्ड : अवेकनिंग’चा तो सिक्वेल असेल. यामध्ये थिओ जेम्स, टोबियास मेन्झिज्, ट्रेन्ट गॅरेट, लारा पुल्वर, पीटर अँडरसन यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत.

                                      

वाचा : व्हॅम्पायर आणि वेअरवुल्फच्या जगातील अद्भुत सफर (‘अंडरवर्ल्ड’स्टार थिओ जेम्सची मुलाखत)

Web Title: Ana Seems, Kate Beckinsell's Best Actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.