एमी शूमर ‘बार्बी’च्या भूमिकेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 22:17 IST2016-12-04T22:17:41+5:302016-12-04T22:17:41+5:30

हॉलिवूड अभिनेत्री एमी शूमर आगामी लाइव्ह अ‍ॅक्शन मुव्ही ‘बार्बी’मध्ये झळकणार असल्याची शक्यता आहे. याविषयी तिच्याशी चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी ...

Amy Shumar plays 'Barbie'? | एमी शूमर ‘बार्बी’च्या भूमिकेत?

एमी शूमर ‘बार्बी’च्या भूमिकेत?

लिवूड अभिनेत्री एमी शूमर आगामी लाइव्ह अ‍ॅक्शन मुव्ही ‘बार्बी’मध्ये झळकणार असल्याची शक्यता आहे. याविषयी तिच्याशी चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

वेराइटी डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार हिलरी विंस्टन यांनी लिहिलेल्या पटकथेत शूमर आणि तिची बहीण किम कॅरमेल यांना भूमिका देण्याची योजना आखली जात आहे. चित्रपटातून बार्बीलॅँडला बाहेर काढण्यात आले. कारण बार्बीलॅँड वास्तविक जगासारखी भासत नव्हती. ‘बार्बी’ जगभरात तीन अरब डॉलर एवढ्या संख्येने विकली जात असून, ती एक वैश्विक ब्रांड पॉवर हाउस आहे. त्यामुळे बार्बीलॅँडऐवजी केवळ बार्बीच हे वास्तविक जग दाखविणार आहे. 

एमीने आतापर्यंत प्रिसेंस, प्रेसिडेंट, मरमेड आणि फिल्म स्टारच्या रूपात १५० पेक्षा अधिक भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटासाठी एमीची भूमिका योग्य समजली जात आहे. हा चित्रपट २०१८ मध्ये रिलीज होणार आहे. शूमर या अगोदर ‘टॅनिव्रक’ या चित्रपटात झळकली होती. येत्या काळात ती गोल्डी हॉन यांच्यासोबत एका कॉमेडी चित्रपटात बघावयास मिळण्याची शक्यता आहे. 

Web Title: Amy Shumar plays 'Barbie'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.