लाइव्ह परफॉर्मन्स सुरू होता, उंचावरुन स्टंट करत गायिकेची एन्ट्री, पडणार तेवढ्यातच...; पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 12:54 IST2025-07-21T12:53:57+5:302025-07-21T12:54:22+5:30

हटके एन्ट्री घेणं एका लोकप्रिय गायिकेला महागात पडलं आहे. लाइव्ह शोमध्ये उंचावरुन एन्ट्री घेताना गायिका पडता पडता वाचली आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

american pop singer kety perry live performance video of falling from prop | लाइव्ह परफॉर्मन्स सुरू होता, उंचावरुन स्टंट करत गायिकेची एन्ट्री, पडणार तेवढ्यातच...; पाहा व्हिडिओ

लाइव्ह परफॉर्मन्स सुरू होता, उंचावरुन स्टंट करत गायिकेची एन्ट्री, पडणार तेवढ्यातच...; पाहा व्हिडिओ

सेलिब्रिटींचे कॉन्सर्ट किंवा लाइव्ह शो दरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी सेलिब्रिटी अशा शोमध्ये हटके एन्ट्री घेतात. पण, अशीच हटके एन्ट्री घेणं एका लोकप्रिय गायिकेला महागात पडलं आहे. लाइव्ह शोमध्ये उंचावरुन एन्ट्री घेताना गायिका पडता पडता वाचली आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

या व्हायरल झालेल्या व्हिडीओत गायिका उंचावर हवेत लटकणाऱ्या पक्षासारख्या आकाराच्या प्रॉपवर बसलेली दिसत आहे. गाणं गात ती लाइव्ह शोमध्ये एन्ट्री घेते. पण, त्यानंतर लगेचच तो प्रॉप हलल्याचं दिसत आहे. तेव्हा गायिकाही डगमगते. पडते की काय भावनेने तिच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले दिसत आहेत. व्हिडीओत दिसणारी ही गायिका अमेरिकन पॉप स्टार केटी पेरी आहे. सॅन फ्रान्सिकोमध्ये तिच्या लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान ही घटना घडली. 

लाइव्ह शोमध्ये ही घटना घडल्याने चाहतेही घाबरले होते. पण, त्यानंतर लगेचच गायिकेने स्वत:ला सावरत परफॉर्मन्स सुरू ठेवला. केटी पोरीचा लाइव्ह शो दरम्यानचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 

Web Title: american pop singer kety perry live performance video of falling from prop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.