एम्बर रोजने सोशल मीडियापासून घेतला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 20:38 IST2016-11-30T20:35:22+5:302016-11-30T20:38:58+5:30

सोशल मीडिया म्हणजे सेलिब्रिटीजना रातोरात स्टारडम मिळवून देण्याचे व्यासपीठ बनले आहे.  त्यांनी एखादा फोटो किंवा कॉमेण्ट शेअर केल्यास लगेचच ...

Amber Rose took a break from social media | एम्बर रोजने सोशल मीडियापासून घेतला ब्रेक

एम्बर रोजने सोशल मीडियापासून घेतला ब्रेक

शल मीडिया म्हणजे सेलिब्रिटीजना रातोरात स्टारडम मिळवून देण्याचे व्यासपीठ बनले आहे.  त्यांनी एखादा फोटो किंवा कॉमेण्ट शेअर केल्यास लगेचच माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनतो. मात्र काही स्टार असेही आहेत, ज्यांना सोशल मीडियाचा तिटकारा आला आहे. आता अशा स्टार्सच्या यादीत मॉडल तथा अभिनेत्री एम्बर रोज हिचाही समावेश झाला आहे.

एम्बरने काही काळासाठी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. याच वर्षी नव्हे तर दरवर्षी ती वषार्तील काही काळ सोशल मीडियापासून दूर राहणार असा तिने संकल्पच केला आहे.  एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, एम्बर ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर नेहमीच आपले फोटोज शेअर करीत असते. परंतु वषार्तील काही काळ ती या सर्व माध्यमांपासून दूर राहणार आहे. 

३६ वर्षीय एम्बरने एका व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. याचा अर्थ तिचे अकाऊंट बंद राहील असे नाही. तिची सहाय्यक हे फोटोज किंवा तिच्याशी संबंधित काही गोष्ट शेअर करून फॅन्सच्या संपर्कात राहणार आहेत. कारण एम्बरविषयी जाणून घेण्याची फॅन्सना नेहमीच उत्सुकता असते. तिच्या आगामी प्रोजेक्ट किंवा लाइफस्टाइलशी संबंधित सर्व बातम्या ती नेहमीच फॅन्ससोबत शेअर करीत असते. त्यामुळे एकाएकी सोशल मीडियापासून दूर जाणे अवघड असल्याने तिने हा निर्णय घेतला आहे. मात्र तिची सहाय्यक जे काही शेअर करणार त्याविषयीची संपूर्ण माहिती एम्बरला असायला हवी, अशी अटही तिने यावेळी घातली आहे. 

सध्या एम्बर सोशल मीडियावरील सर्व अकाऊंटपासून दूर असून, २०१७ च्या सुरुवातीला ती पुन्हा सोशल मीडियावर सक्रीय होणार आहे. सोशल मीडियापासून दूर जाण्यापूर्वी एम्बरने ‘हॅप्पी हॉलिडेज’ अशी पोस्ट शेअर केली आहे. 

Web Title: Amber Rose took a break from social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.