एम्बर हर्ड करीत आहे एका व्यावसायिकाला डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 22:27 IST2017-01-20T16:57:21+5:302017-01-20T22:27:21+5:30

अभिनेत्री एम्बर हर्ड हिने पती जॉनी डेप याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर एका व्यावसायिकाला डेट करीत असल्याची माहिती समोर येत आहे. ...

Amber is doing a hard day | एम्बर हर्ड करीत आहे एका व्यावसायिकाला डेट

एम्बर हर्ड करीत आहे एका व्यावसायिकाला डेट

िनेत्री एम्बर हर्ड हिने पती जॉनी डेप याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर एका व्यावसायिकाला डेट करीत असल्याची माहिती समोर येत आहे. ‘मिरर डॉट को डॉट यूके’च्या रिपोर्टनुसार एम्बर हर्ड व्यावसायिक इलॉन मस्क याच्या प्रेमात पडली आहे. विशेष म्हणजे याचा उलगडा खुद्द एम्बरने तिच्या मित्रांकडे केला असून, तेसला या कार कंपनीच्या प्रमुख पदावर असलेल्या इलॉन मस्कला डेट करीत असल्याचे तिने सांगितले आहे. 



एम्बर हर्ड आणि इलॉन मस्क
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एम्बर हर्ड सध्या जॉनी डेप याच्याशी घेतलेल्या घटस्फोटामुळे आनंदी आहे. त्याचबरोबर इलॉन मस्क याच्यासोबत सार्वजनिक ठिकाणी जाण्यास तिला कायदेशीररीत्या परवानगी मिळाल्याने ती खूश आहे. एम्बर इलॉनच्या एवढी प्रेमात पडली की, ती याबाबतचा खुलासा सार्वजनिकपणे करीत आहे. दोघांमधील फुलत असलेल्या प्रेमसंबंधांविषयी तिने तिच्या मित्रांना सांगितले की, ख्रिसमसच्या एका पार्टीत तिची इलॉन मस्क याच्याशी भेट झाली होती, त्याचवेळी त्याच्या प्रेमात पडली. 

इलॉनलादेखील एम्बर पसंत असून, दोघेही एकमेकांसोबतचे क्षण एन्जॉय करीत आहेत. डेटवर जाण्यासाठी ते रोमांचक प्लॅन करीत आहेत. एम्बरला आयुष्यात पुढे जाण्यासाठी जोडीदार मिळाल्याने ती खूपच हरखून गेलेली आहे. दोघांसाठीही या नव्या आयुष्याचा अध्याय सुरू करण्याची एकप्रकारे संधीच असल्याने ते प्रत्येक क्षण आनंदी जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. 



एम्बर हर्ड आणि जॉनी डेप
खरं तर या दोघांमध्ये चार वर्षांपासूनच प्रेमसंबंध फुलले होते. लंडनमध्ये एकत्र फिरताना या दोघांना बघण्यातही आले होते. कदाचित इलॉन मस्क हाही जॉनी डेप आणि एम्बरमधील घटस्फोटाचे एक कारण असावे. पण काहीही असो सध्या दोघेही एकमेकांसोबत खूश आहेत.

Web Title: Amber is doing a hard day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.