एक्स बॉयफ्रेंडच्या आठवणींमुळे अमांडा एबिंगटनचे लागेना कामात लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 22:02 IST2017-01-07T22:02:56+5:302017-01-07T22:02:56+5:30
अभिनेत्री अमांडा एबिंगटन आणि ‘शेलरेक’ स्टार मार्टिन फ्रीमॅन यांची लव्हस्टोरी जेवढी गाजली तेवढेच त्यांचे ब्रेकअपही गाजले होते. पुन्हा एकमेकांचे ...

एक्स बॉयफ्रेंडच्या आठवणींमुळे अमांडा एबिंगटनचे लागेना कामात लक्ष
अ िनेत्री अमांडा एबिंगटन आणि ‘शेलरेक’ स्टार मार्टिन फ्रीमॅन यांची लव्हस्टोरी जेवढी गाजली तेवढेच त्यांचे ब्रेकअपही गाजले होते. पुन्हा एकमेकांचे तोंड बघायचे नाही, असा निर्धार करून त्यांनी साथ सोडली होती. मात्र अमांडा तिच्या शब्दांवर फारसे स्थिर राहू शकली नाही, असे चित्र सध्या दिसत आहे. एका सिनेमानिमित्त एकत्र यावे लागल्याने मार्टिनसोबतच्या आठवणींनी ती पूर्ती खचून गेली आहे. त्याच्यासोबत काम करणे तिला अवघड होत असून, तिचे कामात अजिबात लक्ष लागत नसल्याचे तिने सांगितले आहे.
मिरर डॉट को डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, एकेकाळी प्रेमात असलेले हे जोडपे सध्या पडद्यावर दाम्पत्याची भूमिका साकारत आहेत. मॅरी आणि जॉन वॉटसन या भूमिका साकारताना अमांडाला मात्र बºयाचशा अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अमांडाने गेल्या रविवारी टेलीग्राफच्या ‘स्टेला’ या साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत ब्रेकअपविषयीचा खुलासा केला. ती म्हणाली की, हा एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय खरोखरच विचित्र होता. त्यामुळे पुन्हा एकत्र येऊन आई-वडिलांची भूमिका साकारणे मला अवघड जात आहे. खरं तर ही भूमिका साकारताना माझ्यावर प्रचंड दडपण होते. त्यामुळे मार्टिनसोबत काम करणे मला अवघडल्यासारखे वाटत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून आम्ही पुन्हा एकत्र काम करीत असल्याने मला मार्टिनचा सहवास आवडत आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा त्याच्यासोबत काम करणे मी पसंत करेल, असा खुलासाही अमांडाने केला आहे.
ब्रेकअपविषयी बोलताना अमांडा म्हणाली की, त्यावेळी रागाच्या भरात किंंवा तत्कालीन घडलेल्या घटनेवरून आम्ही विभक्त झालो. मात्र याचा अर्थ आमच्यातील मैत्री संपली असा नव्हता. आता पुन्हा एकत्र आल्याने आमच्यातील मैत्रीपूर्ण नाते अधिक घट्ट झाले आहेत. मात्र पुन्हा एकत्र येण्याचा मी कधीच विचार करणार नाही. मैत्रीचा निर्णय मुलांच्या हितासाठी असल्यानेच आम्ही एकत्र काम करण्याचा निर्णय घेतल्याचेही अमांडाने स्पष्ट केले.
![]()
अमांडा एबिंगटन एक्स बॉयफ्रेंड मार्टिन फ्रीमॅनसोबत