मृत्यूनंतरही मायकल जॅक्सनची कमाई ५५२३ कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 17:30 IST2016-10-17T17:30:57+5:302016-10-17T17:30:57+5:30

आपल्या हयातीत संगीत क्षेत्रात दबदबा निर्माण करणाºया ‘किंग आॅफ पॉप’ मायकल जॅक्सन याची क्रेझ आजही कायम आहे. त्यामुळेच निधनाच्या ...

After the death, Michael Jackson's earnings increased to Rs 5523 crore | मृत्यूनंतरही मायकल जॅक्सनची कमाई ५५२३ कोटी रुपये

मृत्यूनंतरही मायकल जॅक्सनची कमाई ५५२३ कोटी रुपये

ल्या हयातीत संगीत क्षेत्रात दबदबा निर्माण करणाºया ‘किंग आॅफ पॉप’ मायकल जॅक्सन याची क्रेझ आजही कायम आहे. त्यामुळेच निधनाच्या तब्बल सात वषार्नंतरही त्याची कमाई ५५२३ कोटी रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे. 
फोर्ब्स मॅगझिनने नुकतीच मृत सेलिब्रिटींच्या कमाईची यादी प्रसिद्ध केली. त्यात मायकल जॅक्सनच्या नावे गेल्या १२ महिन्यात रेकॉर्डब्रेक कमाई असल्याचे आढळून आले. मायकलची वर्षभरातील कमाई तब्बल ८२.५ कोटी डॉलर (५५२३ कोटी रुपये) असल्याचा खुलासा करण्यात आला. या कमाईत सोनी/एटीव्ही म्युझिक पब्लिशिंग कॅटलॉगमध्ये मायकल जॅक्सनच्या नावे शेअर विकून होणाºया उत्पन्नाचाही समावेश आहे. मायकलचे २००९ मध्ये निधन झाले होते. तेंव्हापासून केवळ २०१२ या वर्षाचा अपवाद वगळता मृत सेलिब्रिटींच्या कमाईच्या यादीत तो सर्वोच्च स्थानावर आहे. २०१२ साली मायकलची सर्वात जवळची मैत्रिण एलिजाबेथ टेलर ही कमाईत आघाडीवर होती. २०१६ च्या यादीत ती १३ व्या स्थानावर आहे. तर दुसºया स्थानावर कार्टूनिस्ट चार्ल्स एम. शुल्ज हा आहे. मात्र चार्ल्स आणि मायकलच्या कमाईत खूप अंतर आहे. तिसºया स्थानावर गोल्फ लिजेंड आॅर्नल्ड पालमेर आहे. फोर्ब्सतर्फे दरवर्षी अशा प्रकारची यादी प्रसिद्ध केली जाते. 

Web Title: After the death, Michael Jackson's earnings increased to Rs 5523 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.