ब्लूमने ब्रेकअपनंतर दुसऱ्या गर्लफ्रेंडशी केले लंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 16:12 IST2016-11-24T20:09:04+5:302016-11-25T16:12:29+5:30

हॉलिवूडमध्ये ब्रेकअप होणे अन् लगेचच दुसऱ्याच्या प्रेमात पडणे ही बाब काही नवी नाही. अभिनेता ओरलॅँडो ब्लूम याचे गायिका केटी ...

After breakfast, breakfast done to the second girlfriends after breakfast | ब्लूमने ब्रेकअपनंतर दुसऱ्या गर्लफ्रेंडशी केले लंच

ब्लूमने ब्रेकअपनंतर दुसऱ्या गर्लफ्रेंडशी केले लंच

लिवूडमध्ये ब्रेकअप होणे अन् लगेचच दुसऱ्याच्या प्रेमात पडणे ही बाब काही नवी नाही. अभिनेता ओरलॅँडो ब्लूम याचे गायिका केटी पेरी हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर तो लगेचच त्याच्या नव्या गर्लफ्रेंडसोबत एका रेस्टॉरंटमध्ये लंच करताना बघावयास मिळाला. 

एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ओरलॅँडो गेल्या मंगळवारी सोहो हाऊसच्या बाहेर येत असताना कॅमेऱ्यात कैद झाला. जेव्हा तो बाहेर येत होता, तेव्हा कॅमेऱ्यांची फौज तयार असल्याने तो काही काळ घाबरून गेला. त्याने चेहरा लपवित तेथून काही मिनिटातच आपल्या मित्राच्या कारमध्ये बसून पळ काढला. 

वृत्तानुसार पेरी आणि ओरलॅँडो तब्बल १० महिने एकत्र होते. नंतर त्यांच्यात मतभेद झाले. विशेष म्हणजे दोघांचेही नाते अतिशय मैत्रीपूर्ण वातावरणात संपुष्टात आले. दोघांनीही विभक्त होताना मैत्रीचे नाते कायम असेल असे एकमेकांना स्पष्ट केले. 

                               

एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार हॅलोविनमध्ये काही काळ वास्तव्य केल्यानंतर ओरलॅँडोने त्याच्या मित्रांना सांगितले होते की, मी पेरीसोबतचे नाते आता संपविणार आहे. कारण तो लग्न आणि वडील बनण्यासाठी तयार नाही. ओरलॅँडोला पहिली पत्नी मिरांडा केर हिच्यापासून पाच वर्षाचा मुलगा आहे. २०१३ मध्ये ते विभक्त झाले होते.

Web Title: After breakfast, breakfast done to the second girlfriends after breakfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.