ब्रॅड पिटनंतर अ‍ॅँजेलिना जोलीच्या जीवनात आला ‘हा’ मिस्ट्री मॅन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2017 21:02 IST2017-04-22T15:32:14+5:302017-04-22T21:02:14+5:30

पती ब्रॅड पिट याच्याशी घटस्फोट घेण्यासाठी दाखल केलेल्या तक्रारीपासून ते आतापर्यंत अ‍ॅँजेलिना जोलीविषयी दर दिवसाला काही ना काही बातमी ...

After Brad Pitt, Angelina Jolie's life came in 'Ha' Mystery Man !! | ब्रॅड पिटनंतर अ‍ॅँजेलिना जोलीच्या जीवनात आला ‘हा’ मिस्ट्री मॅन!!

ब्रॅड पिटनंतर अ‍ॅँजेलिना जोलीच्या जीवनात आला ‘हा’ मिस्ट्री मॅन!!

ी ब्रॅड पिट याच्याशी घटस्फोट घेण्यासाठी दाखल केलेल्या तक्रारीपासून ते आतापर्यंत अ‍ॅँजेलिना जोलीविषयी दर दिवसाला काही ना काही बातमी समोर येत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून बघावयास मिळत आहे. गेल्या आठवड्यातच अभिनयाला रामराम ठोकल्याची बातमी समोर आली होती. आता ती एका मिस्ट्री मॅनला डेट करीत असल्याची बातमी समोर आली आहे. 

सध्या अ‍ॅँजेलिना पती ब्रॅड पिट याच्याशी घटस्फोट अन् मुलांना आपल्याकडे कायमस्वरूपी सुपूर्द करण्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहे. याचदरम्यान ती एका ब्रिटिश एन्टरप्रन्योर याला डेट करीत आहे. सूत्रानुसार हे दोघे गेल्या काही दिवसांपासून एकत्र वेळ व्यतित करीत असून, त्यांना एकमेकांची कंपनी खूपच भावत आहे. 



हॉलिवूडलाइफ डॉट कॉमने एका सूत्राच्या हव्याल्यानुसार सांगितले की, ब्रॅड पिट याच्यापासून दूर होणे अ‍ॅँजेलिनाला खूपच अवघड झाले होते. यादरम्यान तिला आधाराची गरज स्पष्टपणे जाणवत होती. त्याचवेळी हा मिस्ट्री मॅन तिच्या आयुष्यात आला आहे. ती या मिस्ट्री मॅनला डेट करीत असतानाच यांच्यात प्रेमसंबंध बहरत असल्याचे समजते. 

सूत्रानुसार, अ‍ॅँजेलिनाचा हा मिस्ट्री मॅन एक ब्रिटिश एन्टप्रन्योर आहे. ज्याच्या आंतरराष्टÑीय स्तरावरील राजकीय क्षेत्रात संबंध आहेत. दोघे बºयाचदा मिलाबू येथे भेटले आहेत. ब्रॅडपासून दूर गेल्यानंतर अ‍ॅँजेलिना या ठिकाणी नियमित जात असते. अ‍ॅँजेलिनाचा हा मिस्ट्री मॅन जागतिक स्तरावरील उद्योगपती असून, गेल्यावर्षी लंडन येथे दोघांची भेट झाली होती. 

Web Title: After Brad Pitt, Angelina Jolie's life came in 'Ha' Mystery Man !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.