कान्ये वेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 18:40 IST2016-11-23T18:28:11+5:302016-11-23T18:40:44+5:30

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशियां हिचा पती रॅपर कान्ये वेस्ट याला अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. ही बातमी तेव्हा ...

Admitted in Kanye West Hospital | कान्ये वेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल

कान्ये वेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल

अ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशियां हिचा पती रॅपर कान्ये वेस्ट याला अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. ही बातमी तेव्हा समोर आली जेव्हा त्याचा कन्सर्ट अचानक रद्द करावा लागला. हा कन्सर्ट त्याच्या सेंट पाब्लो टूरचा एक भाग होता, मात्र त्याला हॉस्पिटलमध्ये का भरती केले याविषयी कोणतेही कारण अद्यापपर्यंत पुढे आले नाही. 

एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार लॉस एंजल्सच्या पोलिस विभागाला गेल्या सोमवारच्या दुपारी १ वाजून २० मिनिटाने अचानक फोन आला. एका ठिकाणी काही तरी गडबड झाल्याचे पोलिसांना सांगण्यात आले होते. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा मेडिकल इमरजन्सी म्हणून कान्ये वेस्टला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले अशी माहिती समोर आली. 

ही संपूर्ण घटना अचानक घडल्याने त्याविषयी फारशी माहिती समोर आली नाही. विशेष म्हणजे कान्ये वेस्ट यानेही कन्सर्ट रद्द करण्याचे संयुक्तिक कारण सांगितले नाही. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत असून, कान्ये वेस्ट याला कुठल्या कारणाने हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले याचा तपास करीत आहेत. 
कान्ये वेस्ट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याने सॅन जोस येथे झालेल्या एका कन्सर्टमध्ये जाहीर केले होते की, जर मी अमेरिकेच्या निवडणुकीत मतदान केले तर माझे मत हे डोनाल्ड ट्रम्प यांनाच असेल. कान्ये वेस्टच्या या जाहीर घोषणेमुळे तो माध्यमांमध्ये चर्चेत होता. तसेच राजकीयदृष्ट्या देखील त्याला महत्त्व आले होते. 

दरम्यान गेल्या शनिवारी झालेल्या कन्सर्टमध्ये देखील तो ९० मिनिटे उशिरा पोहोचला होता. तसेच त्याने त्याठिकाणी केवळ दोन गाणी गायली होती.

Web Title: Admitted in Kanye West Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.