‘या’ अभिनेत्रीने म्हटले, ‘मुले सांभाळण्याचे ट्रेनिंग घ्यायचे असेल तर कुत्रे पाळा’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 15:56 IST2017-10-06T10:25:53+5:302017-10-06T15:56:00+5:30

हॉलिवूड अभिनेत्री मिला कुनिस हिचा फंडा ऐकून तुम्ही चकीत झाल्याशिवाय राहणार नाही. लवकरच तिचा बॅड मॉम्सचा सीक्वल ‘अ बॅड ...

The actress said, 'If you want to take training in managing a child, then follow the dog' !! | ‘या’ अभिनेत्रीने म्हटले, ‘मुले सांभाळण्याचे ट्रेनिंग घ्यायचे असेल तर कुत्रे पाळा’!!

‘या’ अभिनेत्रीने म्हटले, ‘मुले सांभाळण्याचे ट्रेनिंग घ्यायचे असेल तर कुत्रे पाळा’!!

लिवूड अभिनेत्री मिला कुनिस हिचा फंडा ऐकून तुम्ही चकीत झाल्याशिवाय राहणार नाही. लवकरच तिचा बॅड मॉम्सचा सीक्वल ‘अ बॅड मॉम्स क्रिसमस’ रिलीज होणार आहे. लास वेगासमध्ये या चित्रपटाशी संबंधित एका इव्हेंटमध्ये कुनिसने सांगितले की, ‘जर तुम्ही कुत्रे पाळले तर तुम्हाला लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी विशेष ट्रेनिंग घेण्याची गरज नाही. कारण कुत्र्यांचा सांभाळ मुलांच्या सांभाळासाठी एखाद्या ट्रेनिंगपेक्षा कमी नाही. मिला कुनिस दोन मुलांची आई आहे. ती मातृत्वाचा प्रत्येक पैलू चांगल्या पद्धतीने जाणून आहे. जेव्हा तिला मातृत्वाविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, ‘मातृत्व अगदी त्याप्रमाणे आहे, ज्याप्रमाणे आपण कुत्रे पाळतो. माझ्याकडे दोन कुत्रे आहेत. कुत्र्यांची मी पूर्वीपासूनच पालन करीत आहे. ते मुलांच्या सांभाळासाठी चांगले ट्रेनर म्हणून सिद्ध झाले आहेत. मी हे चेष्टामस्करीत बोलत नाही. कारण मुलांच्या आणि कुत्र्यांच्या पालनपोषणात बरीचशी समानता आहे. फरक केवळ एवढाच आहे की, जेव्हा तुम्ही घराबाहेर जाता तेव्हा तुम्ही मुलांना कोणाच्या भरवशावर सोडू शकत नाही. मात्र कुत्र्यांच्याबाबतीत तसे करू शकता. 



कुनिसचे हे वक्तव्य अतिशय वादग्रस्त समजले जात असून, सोशल मीडियावर तिच्या या वक्तव्याचा नेटिझन्सकडून चांगलाच समाचार घेतला जात आहे. दरम्यान, ‘अ बॅड मॉम्स क्रिसमस’ हा मिला कुनिसचा पहिलाच सीक्वल चित्रपट आहे. याविषयी मिला कुनिसने सांगितले की, ‘हा माझा पहिलाच सीक्वल आहे. हा चित्रपट खूपच वेगळा आणि मजेशीर आहे. मिला कुनिस हॉलिवूड स्टार एश्टन कूचरची पत्नी आहे. ती ‘ब्लॅक स्वॅन’ आणि ‘फ्रेंड्स विद बेनिफिट्स’ या चित्रपटांमध्ये झळकली आहे. सध्या मिला कुनिस तिच्या या सीक्वलच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

Web Title: The actress said, 'If you want to take training in managing a child, then follow the dog' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.