...या अभिनेत्रीला एका रात्रीसाठी मिळाली करोडो रुपयांची आॅफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 14:56 IST2016-12-22T14:06:24+5:302016-12-22T14:56:21+5:30

नव्या वर्षाची चाहूल लागली असून, त्याच्या स्वागतासाठी जगभरात रंगारंग कार्यक्रमाच्या आयोजनाची जय्यत तयारी केली जात आहे. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत ‘न्यू ...

... The actress gets a crores of rupees for one night | ...या अभिनेत्रीला एका रात्रीसाठी मिळाली करोडो रुपयांची आॅफर

...या अभिनेत्रीला एका रात्रीसाठी मिळाली करोडो रुपयांची आॅफर

्या वर्षाची चाहूल लागली असून, त्याच्या स्वागतासाठी जगभरात रंगारंग कार्यक्रमाच्या आयोजनाची जय्यत तयारी केली जात आहे. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत ‘न्यू ईयर’ सेलिब्रिशनच्या तयारीची धूम असून, प्रत्येकजण आपापल्या अंदाजात नव्या वर्षाचे स्वागत करू पाहत आहेत. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी न्यू ईयरची नाईट अविस्मरणीय करण्यासाठी सेलिब्रिटींना आमंत्रित केले जात असून, त्यासाठी भारीभक्कम किंमतही मोजली जात आहे. अशीच आॅफर हॉलिवूडच्या एका सेलिब्रिटीला आली आहे. अभिनेत्री तथा गायिका जेनिफर लोपेज हिला न्यू ईयर नाइटसाठी तब्बल साडेसहा कोटी रुपयांची आॅफर दिली गेली. मात्र तिने त्यास नकार दिल्याने आयोजकांना धक्का बसला नसेल तरच नवल.
 


होय, हे खरे आहे! सूत्राने दिलेल्या माहितीनुसार २०१७ च्या स्वागतासाठी मियामी येथे एका नाइट क्लबमध्ये न्यू ईयर सेलिबे्रशन नाइटचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जेनिफर लोपेज हिला तब्बल साडेसहा कोटी रुपयांपेक्षा अधिकची आॅफर दिली गेली होती. मात्र तिने स्पष्ट शब्दात नकार दिला. आपल्या कुटुंबीयांसोबत न्यू ईयरचे स्वागत करता यावे यासाठीच जेनिफरने नकार दिल्याचे आयोजकांनी सांगितले. मात्र तिच्या नकारामागचे आयोजकांनी सांगितलेले कारण खरे की खोटे हे मात्र गुलदस्त्यातच आहे. 



टीएमजेड डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, लोपेजने नुकतेच एक आलिशान घर खरेदी केले असून, मुले मॅक्स आणि एमीसोबत ती या घरात शिफ्ट झाली आहे. सध्या ती फॅमिलीसोबत वेळ व्यतीत करीत असून, तिने संपूर्ण लक्ष ‘शेड्स आॅफ ब्लू’ या कॉन्सर्टवर केंद्रित केले आहे. त्याव्यतिरिक्त काही प्रोजेक्टवरही ती काम करीत आहे. त्यामुळे तिला नव्या वर्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होणे शक्य नाही. त्यातच नव्या वर्षाचे सेलिब्रिशन ती मुलांसोबत नव्या घरातच करू इच्छित असल्याने तिने ही करोडो रुपयांची आॅफर नाकारली आहे.



जेनिफरने ही आॅफर नाकारल्याने मियामी येथे होणारा कार्यक्रमच रद्द केला गेल्याचे नाइट क्लबच्या मॅनेजरने स्पष्ट केले आहे. गेल्यावर्षी याच ठिकाणी झालेल्या न्यू ईयर नाइट कार्यक्रमात जेनिफर सहभागी झाली होती. त्यावेळेस जेनिफरचा परफॉर्मन्स सगळ्यांनाच भावला होता. त्यामुळेच कदाचित याहीवर्षी आयोजकांनी जेनिफरला याठिकाणी आमंत्रित केले असावे. परंतु त्यास तिने नकार दिला आहे.

Web Title: ... The actress gets a crores of rupees for one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.