...ही अभिनेत्री एक्स बॉयफ्रेंडलाच करीत आहे डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2017 21:17 IST2017-02-19T15:47:16+5:302017-02-19T21:17:16+5:30

ब्रिटिश मॉडेल तथा अभिनेत्री एलिजाबेथ हर्ले तिचा एक्स बॉयफ्रेंड ह्यूग ग्रांट याला डेट करीत असल्याची तिने कबुली दिली आहे. ...

... this actress is doing to boyfriend Justin Bieber | ...ही अभिनेत्री एक्स बॉयफ्रेंडलाच करीत आहे डेट

...ही अभिनेत्री एक्स बॉयफ्रेंडलाच करीत आहे डेट

रिटिश मॉडेल तथा अभिनेत्री एलिजाबेथ हर्ले तिचा एक्स बॉयफ्रेंड ह्यूग ग्रांट याला डेट करीत असल्याची तिने कबुली दिली आहे. याबाबत एलिजाबेथने सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून आम्ही एकमेकांशी बोलत असून, आमच्यात सध्या चांगले संबंध निर्माण होत आहेत. 

अमेरिकी साप्ताहिकाच्या एका व्हिडीओ चॅटमध्ये ५१ वर्षीय एलिजाबेथने ५६ वर्षीय ग्रांटच्या नावाचा तेव्हा उल्लेख केला जेव्हा तिला ‘सध्या तू कोणाला डेट करीत आहेस’ असे विचारण्यात आले. एलिजाबेथ हर्लेने म्हटले की, २९ वर्षांपूर्वी आम्ही एका सिनेमाच्या दरम्यान भेटलो होतो. पुढे आमच्यात प्रेमसंबंध बहरले. परंतु काही कारणास्तव आमचे हे संबंध संपुष्टात आले. मात्र याचा अर्थ आमच्यातील मैत्री संपली असा होत नाही. आजही आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही रोजच एकमेकांशी बोलत असतो. तो माझा आतापर्यंतचा सर्वात चांगला जोडीदार आहे, असेही तिने म्हटले.  



एलिजाबेथ हर्ले तिचा एक्स बॉयफ्रेंड ह्यूग ग्रांट
नॉटिंग हिल येथील रहिवासी असलेल्या ग्रांटला १९८८ मध्ये मिस्ट्री ड्रामा ‘रोविंग विद द वाइंड’ या सिनेमाच्या सेटवर एलिझाबेथ त्याला भेटली होती. पुढे दोन वर्ष त्यांच्यात प्रेमसंबंध बहरले. २००० मध्ये हे जोडपे विभक्त झाले. विशेष म्हणजे ग्रांट हर्ले याचा मुलगा डॅमियन (१४) याचा गॉड फादर एलिझाबेथचा दुसरा एक्स बॉयफ्रेंड स्टीव बिंग असल्याचे बोलले जाते. दरम्यान, एलिजाबेथने ग्रांटसोबतच्या संबंधाविषयी जाहीरपणे वाच्यता केल्याने त्यांच्या फॅन्सना काहीसा दिलासा मिळाला असेल, हे नक्की.

Web Title: ... this actress is doing to boyfriend Justin Bieber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.