टॉम क्रुजच्या मते, रेमिनी आहे ‘डेविल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 19:04 IST2016-12-20T19:04:10+5:302016-12-20T19:04:10+5:30

हॉलिवूडमधील आघाडीच्या स्टार्समध्ये स्थान निर्माण करणाºया अभिनेता टॉम क्रुज याच्या मते, अभिनेत्री लीह रेमिनी एक ‘डेविल’ आहे. केवळ तोच ...

According to Tom Cruise, Remini is 'Devil' | टॉम क्रुजच्या मते, रेमिनी आहे ‘डेविल’

टॉम क्रुजच्या मते, रेमिनी आहे ‘डेविल’

लिवूडमधील आघाडीच्या स्टार्समध्ये स्थान निर्माण करणाºया अभिनेता टॉम क्रुज याच्या मते, अभिनेत्री लीह रेमिनी एक ‘डेविल’ आहे. केवळ तोच नाही तर काही सायकोलॉजिस्टदेखील ती डेविल असल्याचे म्हणत आहेत, याचा खुलासा खुद्द रेमिनी हिनेच एका कार्यक्रमादरम्यान केला. 

‘लॅरी किंग नाउ’ या टीव्ही कार्यक्रमात घेण्यात आलेल्या मुलाखतीत रेमिनीने सांगितले की, टॉमला असे वाटते की, मी एक डेविल आहे. कारण त्याच्या मते माझ्यासारखे लोक डेविल असतात अन् ते इतरांसाठी घातक असतात. 

फिमेलफर्स्ट डॉट को डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार टॉम एक आदर्श सायकोलॉजिस्ट आहे. कारण तो सायकोलॉजीविषयी चांगल्या पद्धतीने जाणून आहे अन् तो त्यावर विश्वासही ठेवतो. जेव्हा रेमिनीला विचारण्यात आले की, टॉम एक मनोरुग्ण आहे असे तुला वाटते का? तेव्हा रेमिनीने सांगितले की, मी असे म्हणणार नाही. तसेच त्याने मला संबोधलेल्या ‘डेविल’ या शब्दावरदेखील माझा आक्षेप नाही. 

तिच्या मते, टॉमने माझ्याबाबतीत केलेल्या विधानावर मी विश्वास ठेवत नाही. मात्र माझ्या जीवनात घडलेल्या घटनांचा जेव्हा विचार करतेय तेव्हा मला टॉमची आठवण येते. माझ्या आयुष्यात आलेल्या कित्येक लोकांना माझ्यापासून त्रास झाला आहे. 

त्यामुळे तुम्ही मला मनोरुग्ण असे म्हणू शकता, असेही ती म्हणाली. तिच्या नव्या डॉक्युमेंट्ररी बनविण्यामागचा हेतू विचारला असता ती म्हणाली की, गेल्या काही वर्षांपूर्वी अरबो डॉलरच्या घोटाळ्याचे वास्तव बोलण्यासाठी काही पत्रकारांना धमकाविले होते. आता मी याच विषयावर घेऊन डॉक्युमेंट्ररी बनवून या स्कॅमचा भांडाफोड केला. मला आनंद होत आहे की, ऐवढ्या मोठ्या स्कॅमविषयी मी लोकांपर्यंत माहिती पोहचवू शकले. तसेच याविषयी बोलावे म्हणून लोकांना प्रवृत्त केल्याचा मला अभिमान वाटतो, असेही ती म्हणाली. 

Web Title: According to Tom Cruise, Remini is 'Devil'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.