वाढत्या वयाचा स्नोडेनने केला स्वीकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2016 19:36 IST2016-10-23T19:36:34+5:302016-10-23T19:36:34+5:30

मॉडेल आणि टीव्ही अ‍ॅँकर लिजा स्नोडेन सध्या वाढत्या  वयाचा स्वीकार करण्यास मनाची तयारी करीत आहे. तिने मान्य केले की, ...

Accepting the ban by a growing older Snowden | वाढत्या वयाचा स्नोडेनने केला स्वीकार

वाढत्या वयाचा स्नोडेनने केला स्वीकार

डेल आणि टीव्ही अ‍ॅँकर लिजा स्नोडेन सध्या वाढत्या  वयाचा स्वीकार करण्यास मनाची तयारी करीत आहे. तिने मान्य केले की, वाढत्या वयावर रोख लावणे कोणालाही शक्य नाही. 
एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार स्नोडेन हिने हॅलो साप्ताहिकाला मुलाखत देताना सांगितले की, मला माझा स्वत:वर आत्मविश्वास आहे. होय, हे खरे आहे की, माझे वय वाढत आहे त्यामुळे शरीरातही बदल होत आहे. हा नैसर्गिक नियम आहे. आरशात पाहिल्यावर माझ्या चेहºयात बºयाचसा बदल दिसतो.  तुम्हाला याचा स्वीकार करावाच लागेल. आता मला याची जाणीव होत असून, मी वाढत्या वयाचा स्वीकार केला आहे. स्नोडेनच्या मते, चेहºयावरील सुरकत्यांपेक्षा तुमच्यातील गुणवत्ता अधिक महत्त्वपूर्ण असते. 
चेहरा ताजातवाना दिसावा यासाठी ती कॉस्मेटिक सर्जरीऐवजी चेहºयावर अल्ट्रासाउंड ट्रीटमेंट करणे अधिक पसंत करते. ही ट्रीटमेंट त्रासदायक असली तरी, सौदर्यं अबाधित ठेवण्यासाठीअत्यावश्यक असल्याचे ती सांगते. 

Web Title: Accepting the ban by a growing older Snowden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.