अबब...जेनेफर अॅनिस्टने घातला तीन लाखांचा ड्रेस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 20:08 IST2016-12-08T20:01:56+5:302016-12-08T20:08:28+5:30
‘फ्रेंडस्’ अभिनेत्रीने तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रीमियरला घातलेला ड्रेस एवढा महाग आहे की, पाहणाऱ्याचे आणि ऐकणाऱ्याचे डोळे मोठे व्हावेत.

अबब...जेनेफर अॅनिस्टने घातला तीन लाखांचा ड्रेस!
ह लीवूड सुपरस्टार म्हणून काही तरी खर्च करावाच लागेल ना! आणि तुम्ही जर जेनिफर अॅनिस्टनसारखे सेलिब्रेटी असाल तर कपड्यांवर कितीही खर्च केला तरी कमीच. म्हणून तर या ‘फ्रेंडस्’ अभिनेत्रीने तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रीमियरला घातलेला ड्रेस एवढा महाग आहे की, पाहणाऱ्याचे आणि ऐकणाऱ्याचे डोळे मोठे व्हावेत.
‘आॅफिस ख्रिसमस पार्टी’ या चित्रपटाच्या प्रीमियर सोहळ्यात जेनिफरने तब्बल ३५५४ पौंड म्हणजेच सुमारे तीन लाख रुपये प्राईस टॅग असणारा जम्पसुट परिधान केला. संपूर्ण काळ्या रंगाच्या या ड्रेसवर जेनिफर अत्यंत देखणी दिसत होती. सर्वांची नजर खिळवून ठेवण्यात ती यशस्वी ठरली.
![]()
तीन लाखांचा ड्रेस : जेनेफर अॅनिस्टन
प्रसिद्ध डिझायरन ब्रॅडन मॅक्सवेलने हा जम्पसूट डिझाईन केला होता. वन शोल्डर प्रकारातील हा ड्रेस आहे. त्यासोबत परफेक्ट लूकसाठी तिने बरगंडी (लालसर जांभळा ) रंगाचे हील्स घातले होते आणि हातात ब्लॅक क्लच बॅग होती. खांद्याच्या दोन्ही बाजूला सोनेरी रंगाचे केस आणि चांदीचे बे्रसलेट तिच्या सौंदर्यात कमालीची भर घालत होते.
न्यूयॉर्क शहरातील लँडमार्क सनशाईन सिनेमा येथे झालेल्या प्रीमियरमध्ये रेड कार्पेटवर तिची अदा टिपण्यासाठी फोटोग्राफर्सनी गर्दी केली होती. जॉश गॉर्डन आणि विल स्पेक दिग्दर्शित ‘आॅफिस ख्रिसमस पार्टी’ या कॉमेडी चित्रपटात जेनेफरसोबत जेसन बेटमॅन, आॅलिव्हिया मन, टी. जे. मिलर यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.