​अबब...! २ हजार कोटींचा घटस्फोट घेणार जॉर्ज क्लुनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 17:33 IST2016-12-09T17:33:45+5:302016-12-09T17:33:45+5:30

हॉलीवूड सुपरस्टार जॉर्ज क्लुनी आणि त्याची पत्नी अमाल त्यांचा दोन वर्षांचा संसार मोेडून वेगळी चूल मांडण्याची तयारी करीत आहे. ...

Above ...! George Clooney will take a divorce of 2 thousand crores | ​अबब...! २ हजार कोटींचा घटस्फोट घेणार जॉर्ज क्लुनी

​अबब...! २ हजार कोटींचा घटस्फोट घेणार जॉर्ज क्लुनी

लीवूड सुपरस्टार जॉर्ज क्लुनी आणि त्याची पत्नी अमाल त्यांचा दोन वर्षांचा संसार मोेडून वेगळी चूल मांडण्याची तयारी करीत आहे. एका मॅगझीनने दिलेल्या वृत्तानुसार या लोकप्रिय जोडप्याचा घटस्फोट सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक ठरणार आहे.

सुत्रांनुसार, फारकत घेतल्यानंतर जॉर्जला सुमारे ३०० मिलियन डॉलर्सची (सुमारे. २ हजार कोटी रुपये) संपती अमालला द्यावी लागेल. अमालला मुले हवी आहे तर जॉर्ज अद्याप मुलांसाठी तयार नाही. यावरून दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आला असून जॉर्जच्या संपत्तीमधील मोठा वाटा तिला मिळणार आहे, ज्यामध्ये लेक कॉमो व्हिलाचादेखील समावेश आहे.

२०१४ साली त्यांनी जेव्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा ‘त्यांच्या लग्नाची गाठी स्वर्गातच बांधलेली’ आहे, असे त्यांच्या मित्रांना वाटायचे. त्यामुळे दोघांच्या वेगळे होण्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दोघांमध्ये वाढणारे मतभेद एवढे टोकाला गेले की, काही काळापासून ते वेगवेगळे राहत आहेत.



या जोडप्याच्या जवळच्या मित्राने माहिती दिली की, ‘सुरुवातीला एकमेकांच्या आकांत बुडालेल्या जॉर्ज आणि अमालमध्ये आता खूप अंतर पडले आहे. जॉर्ज मुले होऊ देण्यास नकार देत असल्यामुळे ती पूर्णपणे हताश झाली आहे. त्यांच्या संसारच्या गाडीची दोन चाके दोन वेगळ्या दिशांनी जात असल्यामुळे हे लग्न टिकवणे खूप अवघड झाले.

आधी केवळ अमालच्या प्रेमाखातर त्याने मुले होऊ देण्यासाठी होकार दिलासुद्धा होता. परंतु कालांतराने त्या निर्णयाच्या स्ट्रेसमुळे त्याने माघार घेतली. जॉर्ज अमेरिक ा सोडून इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याचाही विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अमालच्या खर्चिक आणि आलिशान लाईफस्टाईलसुद्धा तो कंटाळलेला आहे.

अमाल ही मानव हक्कांसाठी लढणारी लोकप्रिय वकील असून जॉर्ज क्लुनी अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सर्वत्र ओळखला जातो. ‘गुड लक गुड नाईट’, ‘द डिसेंडंटस्’, ‘आईडस् आॅफ मार्च’सारख्या चित्रपटांत त्याने काम केलेले आहे.

Web Title: Above ...! George Clooney will take a divorce of 2 thousand crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.