अबब...जस्टीन बीबरच्या कॉन्सर्टच्या तिकिटाची किंमत ऐकाल तर हैराण व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 13:45 IST2017-02-23T08:13:00+5:302017-02-23T13:45:05+5:30
प्रसिद्ध पॉप स्टार जस्टिन बीबर त्याच्या ‘पर्पस वर्ल्ड टूर’अंतर्गत भारतात येत असून, मुंबई येथे होणाºया त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टचे तिकीट ...
.jpg)
अबब...जस्टीन बीबरच्या कॉन्सर्टच्या तिकिटाची किंमत ऐकाल तर हैराण व्हाल!
प रसिद्ध पॉप स्टार जस्टिन बीबर त्याच्या ‘पर्पस वर्ल्ड टूर’अंतर्गत भारतात येत असून, मुंबई येथे होणाºया त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टचे तिकीट हजारोंमध्ये विकले जात आहे. १० मे रोजी डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होणाºया या कॉन्सर्टसाठी २२ फेब्रुवारीपासून तिकीट विक्रीस सुरुवात करण्यात आली. चार हजार ६० रुपयांपासून सुरुवात होणाºया तिकिटाची किंमत पहिल्याच दिवशी २५ हजार दोनशे रुपये इथपर्यंत गेली. याहीपेक्षा जर तुम्ही व्हिआयपी तिकिटाची किंमत ऐकाल तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण ही किंमत ७६ हजार ७९० रुपये इतकी आहे.
जेव्हा तिकिटांच्या या अव्वाच्या सव्वा किमतीची बाहेर चर्चा पसरली तेव्हा ट्विटर विचित्र स्वरूपाच्या रिअॅक्शन उमटल्या. काहींनी या कॉन्सर्टसाठी शरीराचे अवयव विकण्याचे म्हटले तर काहींनी बीबरच्या संगीतालाच ‘बकवास’ असे म्हटले. काहींनी तर एवढ्या महागड्या किमतीचे तिकिटे कोण खरेदी करणार, असा प्रश्नही उपस्थित केला. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार काही तासांमध्येच या व्हीआयपी तिकिटांची विक्री झाली आहे. त्यावरून भारतात जस्टीनच्या पॉप्युलॅरिटीचा अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो. या व्हीआयपी लोकांना बॅक स्टेजवर जाण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे. जर सगळ्या गोष्टी जुळून आल्या, तर त्यांना जस्टिन बीबरलाही येणार, अशी माहिती समोर येत आहे.
२२ वर्षीय जस्टिन बीबर ग्रॅमी अवॉर्ड विजेता असून, तरुणांमध्ये जबरदस्त फेमस आहे. त्याच्या करिअरचा प्रवास तेव्हा सुरू झाला जेव्हा एका स्टुडिओमध्ये काही जाणकारांनी त्याच्या स्थानिक कार्यक्रमाच्या संगीताचा व्हिडिओ बघितला होता. दरम्यान, तो या आशिया टूरदरम्यान मुंबईसह, टेल अविव आणि दुबई येथे कॉन्सर्ट कररणार आहे. जस्टिनच्या या कॉन्सर्टसाठी त्याच्या फॅन्सबरोबरच बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सूत्रानुसार, अभिनेत्री आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन हे जस्टिनबरोबर परफॉर्म करण्याची शक्यता आहे. नुकतेच वरुण धवन याने ‘ब्रदिनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाच्या प्रमोशनवेळी असे म्हटले होते की, त्याला हा सिनेमा पॉप स्टारला दाखविण्याची इच्छा आहे.

I just read that Justin bieber concert passes in mumbai range from 4000-76000. Seems like its high time that we start selling apple gadgets— J (@yodastoned_) February 21, 2017 ">http://
}}}}I just read that Justin bieber concert passes in mumbai range from 4000-76000. Seems like its high time that we start selling apple gadgets— J (@yodastoned_) February 21, 2017