अबब... सेलेनाने केली एक कोटी डॉलर्सची डील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2016 22:29 IST2016-12-18T22:29:17+5:302016-12-18T22:29:17+5:30

पॉप जगतात सध्या धूम उडवून देणारी गायिका सेलेना गोमेज भरतीच खूश आहे. त्यास कारणही तसेच असून, सेलेनाने एक ब्रॅँडसाठी ...

Abbe ... Selenne has made a deal worth a million dollars | अबब... सेलेनाने केली एक कोटी डॉलर्सची डील

अबब... सेलेनाने केली एक कोटी डॉलर्सची डील

प जगतात सध्या धूम उडवून देणारी गायिका सेलेना गोमेज भरतीच खूश आहे. त्यास कारणही तसेच असून, सेलेनाने एक ब्रॅँडसाठी तब्बल एक कोटी डॉलर्सचा करार केला आहे. 

पेजिक्स डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार सेलेनाने एका लक्झरी ब्रॅँड कोचसोबत एक कोटी डॉलर्सची डील केली आहे. आता गोमेज यापुढे ‘कोच’ या ब्रॅँडच्या जाहिरातीत झळकणार आहे. 

खरं तर २०१६ हे वर्ष गोमेजसाठी अतिशय यशस्वी वर्ष ठरले आहे. इन्स्टाग्रामवर अनेक रेकॉर्ड करणारी गोमेज प्रसिद्धी झोतात आली. याचा फायदा तिला तिच्या करिअरसाठीदेखील झाला. तिला एकापेक्षा एक आॅफर्स मिळत गेल्या. अनेक ब्रॅण्डसाठी ती करारबद्ध झाली आहे. मात्र कोच या ब्रॅण्डसोबत केलेली डील आतापर्यंतची सगळ्यात मोठी डील ठरली आहे. 

सेलनाचे इन्स्टाग्रामवर १०.४ कोटी फॉलोअर्स असून, तिच्यावर चाहत्यांच्या प्रेमाचा ओघ सुरूच आहे. सलग दुसºया वर्षी ती सोशल मीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी ठरली आहे.


Web Title: Abbe ... Selenne has made a deal worth a million dollars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.