९/११ हल्ल्यामुळे स्फुरली ‘हाऊ आय मेट...’ची प्रेरणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 16:16 IST2016-10-26T16:16:11+5:302016-10-26T16:16:11+5:30

हीट अमेरिकन टीव्ही सिरीज ‘हाऊ आय मेट यूवर मदर’चे (एचआयएमवायएम) लेखक-निर्मार्ते कार्टर बेज आणि क्रेग थॉमस यांनी नुकताच खुलासा ...

9/11 inspired by the inspiration of 'Hau I Met ...' | ९/११ हल्ल्यामुळे स्फुरली ‘हाऊ आय मेट...’ची प्रेरणा

९/११ हल्ल्यामुळे स्फुरली ‘हाऊ आय मेट...’ची प्रेरणा

ट अमेरिकन टीव्ही सिरीज ‘हाऊ आय मेट यूवर मदर’चे (एचआयएमवायएम) लेखक-निर्मार्ते कार्टर बेज आणि क्रेग थॉमस यांनी नुकताच खुलासा केला की, या मालिकेचा भावनिकदृष्ट्या उगम ‘११ सप्टेंबर २००१’ च्या अतिरेकी हल्ल्यामुळे झाला होता. न्यूयॉर्क टेलिव्हिजन फेस्टिव्हलमध्ये ते बोलत होते.

वर्ल्ड ट्रेड सेंटरवर पॅसेंजर विमान धडकवून झालेल्या या हल्ल्यातून अमेरिक न लोकांसाठी काही तरी लिहावे या आत्मप्रेरणेतून या मालिकेची सुुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. ९/११चा हल्ला झाला तेव्हा ते दोघे ‘लेट शो विथ डेव्हिड लेटरमन’ या शोसाठी लिखाण करत होते.

त्यांना पारंपरिक फॉरमॅटपेक्षा काही तरी वेगळे लिखाण करायचे होते. ते सांगतात की, ‘लोकांना आपलेसे वाटणारे पात्र आणि कथा घेऊन ‘आऊट आॅफ द बॉक्स’ काही तरी निर्माण करावे, असे आम्हाला वाटत होते. शिवाय ९/११च्या हल्ल्यामुळे सामान्य लोकांचे भावविश्व पूर्णपणे बदलून गेले होते. त्याला सांभाळत आम्ही ही सिरीज निर्माण केली.’

 Craig Thomas and Carter Bays
लेखक-निर्माते : क्रेग थॉमस  आणि कार्टर बेज 

पाच मित्रांच्या या सिरीजमध्ये नील पॅट्रिक हॅरिस, जेसन सिगल, कोबी स्मल्डर्स, जॉश रेडनर आणि अलिसन हॅनिगन यांनी अनुक्रमे बार्नी, मार्शल, रॉबिन, टेड व लिली या पाच मित्रांच्या भूमिका साकारलेल्या आहेत. २००५ ते २०१४ दरम्यान नऊ सीझन्समध्ये ही मालिका टेलिकास्ट करण्यात आली होती.

Web Title: 9/11 inspired by the inspiration of 'Hau I Met ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.