‘बेन-हर’मुळे निर्मात्यांना ३२३ कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2016 12:47 IST2016-11-12T12:45:43+5:302016-11-12T12:47:29+5:30
यावर्षी प्रदर्शित झालेला बिग बजेट चित्रपट ‘बेन-हर’ बॉक्स आॅफिसवर चांगलाच आपटला. सुमारे १०० मिलियन डॉलर्स (६७५ कोटी रु.) खर्च ...

‘बेन-हर’मुळे निर्मात्यांना ३२३ कोटींचे नुकसान
य वर्षी प्रदर्शित झालेला बिग बजेट चित्रपट ‘बेन-हर’ बॉक्स आॅफिसवर चांगलाच आपटला. सुमारे १०० मिलियन डॉलर्स (६७५ कोटी रु.) खर्च करून तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनी झिडकारले. अमेरिकेत तर ‘बेन-हर’ने केवळ २६ मिलियन डॉलर्सचा (१७५ कोटी रु.) गल्ला जमवला.
सिनेमाच्या अशा वाईट परफॉर्मन्समुळे प्रोडक्शन कंपनी ‘एमजीएम’ला जवळपास ४७.५ मिलियन डॉलर्सचा (३२३ कोटी रु.) मोठा तोटा सहन करावा लागला. नुकतेच कंपनीने तिसऱ्या तिमाहीतील व्यवसायाची आकडेवारी जाहीर केली. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदाची कमाई २०.२ मिलियन डॉलर्सने कमी आहे.
टिमूर बेकमॅम्बेटोव्ह दिग्दर्शित ‘बेन-हर’ कडून खूप अपेक्षा होत्या. ल्यु वॅलॅस लिखित कादंबरीवर आधारित १९५९ साली आलेल्या ‘बेन-हर’ चित्रपटाचा रिमेक होता. मूळ सिनेमाचे दिग्दर्शन महान दिग्दर्शक विल्यम वायलर यांनी तर चार्ल्टल हेस्टन प्रमुख भूमिकेत होता.
![]()
बेन-हर (२०१६)
त्याकाळी सिनेमाने बॉक्स आॅफिसवर तगडी कमाई केली होती. शिवाय ११ आॅस्कर पुरस्कारांवर नावसुद्धा कोरले होते. नव्या ‘बेन-हर’ने संपूर्ण जगात केवळ ९४ मिलियन डॉलर्सची कमाई केली.
![]()
बेन-हर (१९५९)
चित्रपटांनी जरी निराशा केली असली तरी ‘एमजीएम’ला टीव्हीमुळे चांगला लाभ झाला आहे. यंदा १०८ टक्क्यांनी टीव्ही व्यवसाय वाढला असून तो १८५.२ मिलियन डॉलर्स (सुमारे १२५० कोटी रु.) एवढा नफा झाला आहे.
![]()
व्हायकिंग्स
त्यामध्ये ‘व्हायकिंग्स’, ‘सेलिब्रेटी अॅप्रेन्टिस’, ‘द व्हॉइस’ आणि ‘सर्व्हावर ’ अशा सुपरहीट मालिकांचा सामावेश आहे. चालू वर्षात कंपनीला ३९५ मिलियन डॉलर्स (२६६८ कोटी रु.) नफा होण्याचा अंदाज सीईओ गॅरी बार्बर यांनी वर्तवला आहे.