हिट चित्रपटासाठी वाट्टेल ते करणार
By Admin | Updated: October 9, 2014 23:39 IST2014-10-09T23:39:33+5:302014-10-09T23:39:33+5:30
बिपाशा बासूचे नुकतेच रिलीज झालेले काही चित्रपट फारशी काही कमाल दाखवू शकले नाहीत. आता तिची मदार अलोन या एकमेव चित्रपटावर आहे.

हिट चित्रपटासाठी वाट्टेल ते करणार
बिपाशा बासूचे नुकतेच रिलीज झालेले काही चित्रपट फारशी काही कमाल दाखवू शकले नाहीत. आता तिची मदार अलोन या एकमेव चित्रपटावर आहे. हा चित्रपट हिट करण्यासाठी बिपाशा सध्या जीवतोड मेहनत करताना दिसते. हा चित्रपट एकच शरीर असलेल्या दोन जुळ्या मुलींची ही कथा आहे. बिपाशा या विषयावर गेल्या काही दिवसांपासून रिसर्च करीत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनीही चित्रपटाचे टायटल बदलले असून चित्रपटाच्या रिलीज डेटमध्येही बदल केले आहेत. आता आपल्यासाठी आरपारची लढाई असल्याचे बिपाशाला कळून चुकले आहे. त्यामुळे हा चित्रपट जुन्या चित्रपटांप्रमाणेच फ्लॉप ठरला, तर करिअरसाठी चांगले नाही. सनी लियोनला घेऊन
‘रागिनी एमएमएस-२’ सारखा हिट चित्रपट बनवणारे भूषण कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, तर बिपाशासोबत करण सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे.