ईशाने स्वत:च उडवली साखरपुड्याची अफवा
By Admin | Updated: April 14, 2016 04:08 IST2016-04-14T04:08:53+5:302016-04-14T04:08:53+5:30
प्रसिद्धी आणि लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी काहीही करणारे बॉलीवूडमध्ये अनेक आहेत. आता ईशा गुप्ताबद्दलही काहीसे असेच म्हणावे लागेल. गेल्या अनेक दिवसांपासून ईशा गुप्ता

ईशाने स्वत:च उडवली साखरपुड्याची अफवा
प्रसिद्धी आणि लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी काहीही करणारे बॉलीवूडमध्ये अनेक आहेत. आता ईशा गुप्ताबद्दलही काहीसे असेच म्हणावे लागेल. गेल्या अनेक दिवसांपासून ईशा गुप्ता लाइमलाइटमधून गायब होती, पण नुकताच तिने अचानक इंस्ट्राग्रामवर एक फोटो शेअर केला. शिवाय, ‘त्याने विचारले आणि मी हो म्हटले,’ असे कॅप्शनही दिले. तो फोटो होता बोटातील हिऱ्याच्या अंगठीचा. साहजिकच, ईशाचा साखरपुडा झाला, असा या फोटोचा अर्थ काढून लोकांनी ईशाला शुभेच्छा देणेही सुरू केले. मात्र, काही तासांतच ईशाने आपल्या साखरपुड्याच्या बातमीचे खंडन केले. ‘माझा साखरपुडा झालेला नाही, तर मी एका ज्वेलरी ब्रांडची शूटिंग करीत होते व लोकांना मूर्ख बनवत होते...’