सलमानच्या नजरेत भरण्यासाठी 'तिची' धडपड

By Admin | Updated: October 21, 2016 12:33 IST2016-10-21T12:33:18+5:302016-10-21T12:33:18+5:30

बॉलिवूडमध्ये मोठी संधी मिळावी यासाठी अनेक हिरॉईन्स सलमान खानचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात.

'Her' struggle to pay attention to Salman's eyes | सलमानच्या नजरेत भरण्यासाठी 'तिची' धडपड

सलमानच्या नजरेत भरण्यासाठी 'तिची' धडपड

tyle="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २१ - बॉलिवूडमध्ये मोठी संधी मिळावी यासाठी अनेक हिरॉईन्स सलमान खानचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्ये आता अंतरा बिस्वास या  भोजपूरी अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. भोजपूरी इंडस्ट्रीमध्ये अंतरा मोना लिसा म्हणून ओळखली जाते. 
 
बिग बॉसच्या १० व्या सीझनमध्ये अंतरा सुद्धा एक स्पर्धक आहे. सलमानचे लक्ष माझ्यावर जाईल, त्याच्या नजरेत भरण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन असे अंतराने सांगितले. 
 
सलमान बिग बॉस रिअॅलिटी शो चा सूत्रसंचालक आहे. अंतरा मूळची कोलकत्याची आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी तिने सलमानचे लक्ष वेधून घेण्याची इच्छा बोलून दाखवली. हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण करण्याची संधी म्हणून अंतरा बिग बॉसकडे पाहते. 

Web Title: 'Her' struggle to pay attention to Salman's eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.