'ए दिल...' प्रदर्शित होऊ देणार नाही, मनसे भूमिकेवर ठाम
By Admin | Updated: October 18, 2016 16:05 IST2016-10-18T15:39:41+5:302016-10-18T16:05:26+5:30
'ए दिल है मुश्किल सिनेमाला आमचा विरोध कायम असून आम्ही तो सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही',अशी भूमिका मनसेचे अमेय खोपकर यांनी पुन्हा मांडली आहे.

'ए दिल...' प्रदर्शित होऊ देणार नाही, मनसे भूमिकेवर ठाम
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - 'ए दिल है मुश्किल सिनेमाला आमचा विरोध कायम असून आम्ही तो सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही',अशी भूमिका मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पुन्हा मांडली आहे. 'पाकिस्तानी कलाकार असलेला एकही सिनेमा प्रदर्शित होऊ न देण्यासंदर्भातील हे आंदोलन आहे', असेही त्यांनी सांगितले आहे.
मात्र, 'ए दिल है मुश्किल' प्रदर्शित करणा-या सिनेमागृहांना सुरक्षा पुरवणार असल्याचे आश्वासन मुंबई पोलिसांनी सिनेमाचा दिग्दर्शक करण जोहरला दिले आहे. यावरही अमेय खोपकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'आम्ही नेहमी मुंबई पोलिसांसोबत आहोत,मात्र पाकिस्तानी कलाकार असलेल्या सिनेमाला पोलीस सुरक्षा पुरवणार असल्याची बाब लाजिरवाणी आहे', असेही अमेय खोपकर म्हणाले आहे.
आणखी बातम्या
'ए दिल है मुश्किल'मध्ये पाकिस्तानी कलाकर फवाद खान असल्यामुळे सिनेमा अडचणीत आला आहे. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेल्या बॉलिवूडमधील सिनेमांनाही विरोध करत संबंधित सिनेमे प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका मनसेही घेतली आहे.