दिल दोस्ती दुनियादारी करणार प्रेक्षकांना अलविदा
By Admin | Updated: January 29, 2016 11:55 IST2016-01-29T11:55:11+5:302016-01-29T11:55:26+5:30
दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असली तरी थोड्याच काळात नवीन भागांसह ते पुन्हा येणार आहेत.

दिल दोस्ती दुनियादारी करणार प्रेक्षकांना अलविदा
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - आजची तरूणाई मालिकांच्या जंजाळात फारशी अडकत नसली तरी झी मराठीवरील 'दिल दोस्ती दुनियादारी' अर्थात D3 ही मालिका मात्र लहान मुलांपासून-वयोवृद्धापर्यंत सर्वजण आवडीने पाहतात. सर्वांमध्ये लोकप्रिय असलेली ही मालिका आता प्रेक्षकांना अलविदा करणार पण अगदी थोड्याच काळासाठी... कारण एक छोटासा ब्रेक घेऊन नव्या रुपात आणि नव्या दमात या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल येणार आहे. डोंबिवलीतील एका कार्यक्रमात ही मालिका अल्पविराम घेणार असल्याची घोषणा करण्यात आली.
‘मस्ती नाय तर दोस्ती नाय’ असं म्हणणा-या मालिकेतील आशू, मिनल, सुजय, रेश्मा, कैवल्य आणि अॅना या सर्वांनीच प्रेक्षकांच्या घरात आणि मनातही स्थान मिळवलं. आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी ही दुनियादारी गँग आणि त्यांच्या आयुष्यात घडणारे अनेक प्रसंग प्रत्येकाला आपल्या घरातले वाटतात. मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच ही मालिका काही काळासाठी ब्रेक घेणार आहे. या बातमीमुळे प्रेक्षकांना जरी वाईट वाटत असलं तरी ते मालिकेच्या नव्या पर्वाची आणखी उत्सुकतेने वाट पाहत आहेत.