‘हरियाणाच्या शेरणी’चा ‘धोबी पछाड’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 02:11 IST2016-03-13T02:11:00+5:302016-03-13T02:11:00+5:30

अनुष्का शर्मा ही सध्या ‘सुल्तान’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. यातील तिच्या भूमिकेसाठी तिने प्रोफेशनल रेसलर्स कडून ट्रेनिंग घेतली आहे. जवळपास सहा आठवडे तिने ट्रेनिंग घेतली आहे

'Haryana's surname' 'Dhobi Patch'! | ‘हरियाणाच्या शेरणी’चा ‘धोबी पछाड’!

‘हरियाणाच्या शेरणी’चा ‘धोबी पछाड’!

अनुष्का शर्मा ही सध्या ‘सुल्तान’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. यातील तिच्या भूमिकेसाठी तिने प्रोफेशनल रेसलर्स कडून ट्रेनिंग घेतली आहे. जवळपास सहा आठवडे तिने ट्रेनिंग घेतली आहे. नुकताच दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी चित्रपटातील एक फोटो टिष्ट्वटरवर पोस्ट केला आहे. अनुष्काची भूमिका ही ‘हरयाणाची शेरणी’ ची आहे. म्हणजे तिचा सेटवरील अ‍ॅक्शन सीन साकारतांनाचा फोटो तुम्ही पाहिल्यास ते लक्षात येईल. अनुष्का मॅचसाठी शूटींग करत असून तिच्या विरूद्ध असलेल्या पहेलवानाला धोबी पछाड करून सोडले आहे. जफरने फोटोला कॅप्शन टाक ले आहे की, ‘ हरयाणे की शेरणी’ धोबी पछाड मास्टर अनुष्का शर्मा इन अ‍ॅक्शन अ‍ॅट सुल्तान.’ अनुष्काने त्याला टिष्ट्वट केले, ‘ दोन महिन्यांअगोदर मी हे करू शकेन असे मला वाटलेही नव्हते. ही फक्त सुरूवात आहे.’ चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत असून चित्रपट २०१६ ईदला रिलीज होणार आहे.

Web Title: 'Haryana's surname' 'Dhobi Patch'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.