हरमनला पुन्हा वडिलांचा आधार
By Admin | Updated: November 24, 2014 02:35 IST2014-11-24T02:35:34+5:302014-11-24T02:35:34+5:30
हरमन बावेजाला पुन्हा त्याचे वडील हॅरी बावेजा यांनी आधार दिला आहे. हॅरी बावेजा एक नामांकित दिग्दर्शक

हरमनला पुन्हा वडिलांचा आधार
गेले अनेक दिवस पडद्यावरून गायब असलेल्या हरमन बावेजाला पुन्हा त्याचे वडील हॅरी बावेजा यांनी आधार दिला आहे. हॅरी बावेजा एक नामांकित दिग्दर्शक असून त्यांच्यात लव स्टोरी २०५० या चित्रपटातून हरमनने बॉलीवूड पदार्पण केले होते. आगामी चित्रपटात हरमन मुख्य भूमिका साकारणार असल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटाबाबत जास्त माहिती द्यायला त्यांनी नकार दिला. सध्या हॅरी त्यांच्या चार साहीबजादे या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करीत आहेत. लोकांकडून अशा प्रकारच्या प्रतिक्रियांची अपेक्षा नव्हती, असे त्यांचे म्हणणे आहे. ते म्हणतात,
‘मी आनंदात आहे, कारण लोकांना माझा चित्रपट आवडला आहे. मला आणखी काय हवे.’ चार साहीबजादे ६ नोव्हेंबरला रिलीज झाला होता.