खुश आहे मर्दानी राणी
By Admin | Updated: August 28, 2014 02:13 IST2014-08-28T02:13:00+5:302014-08-28T02:13:00+5:30
अभिनेत्री राणी मुखर्जी नुकताच रिलीज झालेल्या ‘मर्दानी’ या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिक्रियांमुळे खुश आहे.

खुश आहे मर्दानी राणी
अभिनेत्री राणी मुखर्जी नुकताच रिलीज झालेल्या ‘मर्दानी’ या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिक्रियांमुळे खुश आहे. या चित्रपटात राणी एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असून तिने त्यात जबरदस्त अॅक्शन केली आहे. हा चित्रपट मानव तस्करीवर आधारित आहे. या चित्रपटाला समीक्षकांसह प्रेक्षकांच्याही चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या असून, व्यावसायिकदृष्ट्याही चित्रपट यशस्वी ठरला आहे. याबाबत राणी म्हणाली की, ‘मी खूप खूप खुश आहे. मला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. जगभरात लोक या चित्रपटासाठी उभे राहून टाळ्या वाजवत आहेत. मला वाटते आम्हाला योग्य नस सापडली आहे. आम्ही या चित्रपटातून एक प्रकारची जागरूकता आणण्याचा प्रयत्न केला होता.