"अर्धे आयुष्य गैरसमजात...", बाबिल खानने मागितली माफी, शेअर केला वडील इरफानचा रडतानाचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 09:19 IST2025-05-05T09:18:59+5:302025-05-05T09:19:28+5:30

Babil Khan : बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खानने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात त्याने बॉलिवूडबाबत खळबळजनक विधान केले होते.

''Half my life in misunderstanding...'', Babil Khan apologizes, shares video of father Irrfan crying | "अर्धे आयुष्य गैरसमजात...", बाबिल खानने मागितली माफी, शेअर केला वडील इरफानचा रडतानाचा व्हिडीओ

"अर्धे आयुष्य गैरसमजात...", बाबिल खानने मागितली माफी, शेअर केला वडील इरफानचा रडतानाचा व्हिडीओ

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता इरफान खान(Irfan Khan)चा मुलगा बाबिल खान(Babil Khan)ने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात त्याने बॉलिवूडबाबत खळबळजनक विधान केले होते. त्याच्या व्हिडीओमध्ये तो बॉलिवूडवर टीका करत आणि घराणेशाही आणि लॉबीवर बोलत मोठ्याने रडताना दिसला होता. बाबिल खानने त्याच्या व्हिडिओमध्ये काही कलाकार आणि गायक अरिजित सिंगचे नावही घेतले. त्याने ज्या कलाकारांना लक्ष्य केले आहे त्यांच्या यादीत स्टार किड्स तसेच अनेक बाहेरील लोकांचा समावेश होता. दिवंगत इरफान खानच्या मुलाने अनन्या पांडे, राघव जुयाल, अर्जुन कपूर, गौरव आदर्श, शनाया कपूर, अरिजित सिंग यांचे नाव घेऊन एक भावनिक पोस्ट शेअर केली.

सिनेइंडस्ट्रीबद्दल नाराजी व्यक्त करताना बाबिल खानने बॉलिवूडला बनावट आणि असभ्य म्हटले होते. हा व्हिडिओ व्हायरल होताच, अभिनेत्याने त्याचे इंस्टाग्राम हँडल डिलीट केले, परंतु प्रकरण वाढताच, बाबिल खानच्या टीमने एक निवेदन जारी करून त्याचे विधान स्पष्ट केले. या घटनेच्या काही तासांतच तो इंस्टाग्रामवर परतला. बाबिल खानने एक एक करून सर्वांची माफी मागितली. सोशल मीडियावर परत येताच, बाबिल खानने सर्वात आधी इंडस्ट्रीतील त्याच्या मित्रांची माफी मागितली. त्याने अर्जुन कपूर, राघव जुयाल, गौरव आदर्श, अरिजित सिंग यांच्या नावाने पोस्ट शेअर केल्या आणि त्याचे स्पष्टीकरण दिले. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, सोशल मीडियावर इतर कोणत्याही गोष्टीत अडकण्याची त्याच्यात ऊर्जा नाही, परंतु त्याच्या मित्रांना आणि ज्यांचा तो आदर करतो त्यांना स्पष्टीकरण देणे ही त्याची जबाबदारी आहे.

राघव जुयालला बाबिल खान म्हणाला...
बाबिल खानने राघव जुयालचे नाव त्याच्या पोस्टमध्ये मेंशन करत लिहिले की, राघव भाई तू माझा आयकॉन आहेस, माझा आयडल, माझा मोठा भाऊ जो कधी माझ्याजवळ नव्हता. त्याने गौरव आदर्शची पोस्ट शेअर करत लिहिले की, 'धन्यवाद भावा.. अर्धे आयुष्य गैरसमजात गेले आहे, पण खऱ्या मित्रांसोबत तुमचं मन शुद्ध ठेवा, ही माझी इच्छा आहे'.

इरफानचा सिनेमात रडतानाचा व्हिडीओ केला शेअर 
अभिनेत्याने त्याचे दिवंगत वडील इरफान खानचा रडण्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्याच्या व्हिडिओद्वारे त्याने त्याच्या भावनिक बिघाडाबद्दल समाजाच्या विचारसरणीवर टीका केली आहे. व्हिडीओमध्ये इरफान खानला रडताना पाहून एक महिला त्याला म्हणते की, तू एक पुरूष आहेस, धाडसी हो, तू का रडत आहेस. या वक्तव्याद्वारे बाबिल खानने त्याची खिल्ली उडवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Web Title: ''Half my life in misunderstanding...'', Babil Khan apologizes, shares video of father Irrfan crying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.