गुलाबाची कळी जाणार हॉलिडेला
By Admin | Updated: March 18, 2016 01:20 IST2016-03-18T01:20:09+5:302016-03-18T01:20:09+5:30
प्रत्येक व्यक्तीला बिझी शेड्यूलमधून आरामासाठी मोकळ्या वेळेची गरज असते. स्वत:साठी व फॅमिलीसाठी निवांत वेळ मिळावा, अशी अपेक्षादेखील असते. त्यात जर सेलीब्रिटी कोणी असेल

गुलाबाची कळी जाणार हॉलिडेला
प्रत्येक व्यक्तीला बिझी शेड्यूलमधून आरामासाठी मोकळ्या वेळेची गरज असते. स्वत:साठी व फॅमिलीसाठी निवांत वेळ मिळावा, अशी अपेक्षादेखील असते. त्यात जर सेलीब्रिटी कोणी असेल तर त्यांना हॉलिडे मस्ट. म्हणूनच गुलाबाची कळी म्हणजे, तेजस्विनी पंडित ही ‘७ रोशन व्हिला’, ‘तिचा उंबरठा’ असे हिट चित्रपट दिल्यानंतर, तिला ब्रेक घेण्याची गरज वाटल्याने तिने हॉलिडेला जाण्याचा विचार केला आहे. याबाबत तेजस्विनीशी ‘लोकमत सीएनएक्स’ने संवाद साधला असता, ती म्हणाली, सतत शूटिंग, प्रमोशन यामुळे लाइफ एकदम बिझी झाली होती. स्वत:लादेखील वेळ मिळत नव्हता; पण आता आराम व निवांतपणा मिळावा, यासाठी दीड महिना अमेरिकेला हॉलिडेसाठी जाण्याचे ठरविले आहे. कारण, अमेरिकेला नवरा व बहीण राहत असल्यामुळे त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करायचा आहे. पुन्हा नॉर्मल रुटीनला आल्यानंतर आय एम रेडी फॉर वर्क.