"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 12:46 IST2025-09-30T12:46:36+5:302025-09-30T12:46:54+5:30
आता सुनिताने त्यांच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे. गेल्या १५ वर्षांपासून वेगळं राहत असल्याचं गोविंदाच्या पत्नीने सांगितलं आहे. सासरच्या लोकांवरही सुनिता अहुजाने आरोप केले आहेत.

"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा त्यांच्या वैवाहिक जीवनामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहेत. सुनिता अहुजाने गोविंदाला घटस्फोटाची नोटीसही पाठवली होती. पण, नंतर घटस्फोट घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आता सुनिताने त्यांच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे. गेल्या १५ वर्षांपासून वेगळं राहत असल्याचं गोविंदाच्या पत्नीने सांगितलं आहे. सासरच्या लोकांवरही सुनिता अहुजाने आरोप केले आहेत.
सुनिताने तिच्या व्लॉगमध्ये याबाबत खुलासा केला आहे. सुनीता म्हणाली, "प्रॉब्लेम हा आहे की गोविंदाच्या कुटुंबातील लोकांना मला आणि गोविंदाला एकत्र येऊ द्यायचं नाही. त्यांची मुलं बाळ या जगात नाहीत. ते हाच विचार करतात की यांचं कुटुंब इतकं सुखी आणि आनंदी कसं? गोविंदा चांगल्या लोकांसोबत राहत नाही. तुमची संगत वाईट असेल तर तुम्हीही तसेच होता. माझं फ्रेंड सर्कल नाही. पण, माझी मुलंच माझे मित्र आहेत".
"मी आणि गोविंदा १५ वर्षांपासून वेगळे राहत आहोत. पण, तो घरी येत असतो. एका चांगल्या स्त्रीला जो दु:खी करतो तो स्वत: कधीच सुखात राहू शकत नाही. तो बैचेनच राहणार. मी त्याला माझं संपूर्ण आयुष्य दिलं आहे. आजही मी त्याच्यावर खूप प्रेम करते. पण मी त्याच्यावर नाराज आहे", असंही सुनिताने सांगितलं.
सुनीता आणि गोविंदाने १९८७मध्ये लग्न करत संसार थाटला होता. त्यांना यशवर्धन हा मुलगा आणि टीना ही मुलगी आहे. गणपतीत त्यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र दिसलं होतं. पण, सुनीता आणि गोविंदाच्या नात्यात दुरावा आला आहे. त्यामुळेच त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चाही होत आहेत.